18 September 2020

News Flash

पुलवामात ‘लष्कर ए तोयबा’च्या कमांडरचा खात्मा, चकमक सुरूच

एक जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे.

संग्रहित छायाचित्र(AP Photo/Dar Yasin)

जम्मू काश्मीरमधील पुलवामातील काकपोरा परिसरातील बांदेरपोरा येथे झालेल्या चकमकीत भारतीय सुरक्षा दलांनी लष्कर ए तोएबाचा कुख्यात दहशतवादी अयूब लाहिरीचा खात्मा केला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लाहिरी ‘लष्कर’चा विभागीय कमांडर होता. सुरक्षा दलांना एका घरात तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे सुरक्षा दलांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली. या शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू करण्यात आला. भारतीय सुरक्षा दलाकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले. या चकमकीत एक जवानही जखमी झाल्याचे बोलले जात आहे.

सध्या सुरक्षा दलांकडून उर्वरित दहशतवाद्यांना घेरण्यात आले आहे. दोन्हीबाजूने गोळीबार सुरू आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गावात दहशतवादी आल्याची माहिती मिळाल्यानंतर ४७ राष्ट्रीय रायफल्सच्या नेतृत्वाखाली सेना आणि राज्य पोलिसांच्या विशष पथकाने शोध मोहीम सुरू केली होती.

शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सैनिकांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल केलल्या गोळीबारात ‘लष्कर’चा टॉप कमांडर अयूब लाहिरी मारला गेला. अजूनही गोळीबार सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2017 7:16 pm

Web Title: let commander ayub lelhari killed in encounter between security forces in kakporas banderpora in pulwama jammu kashmir
Next Stories
1 बंगळुरू जलमय; अवघ्या पाच तासांत महिन्याचा पाऊस
2 ‘भारताला हिंदुस्तान म्हणणाऱ्या मोदींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा’
3 गुंगीचे औषध देऊन राजधानी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना लुटले
Just Now!
X