22 October 2020

News Flash

शिरीष कुंदरचा दिल्लीच्या ‘एलजी’ना टोला, एलजी इलेक्ट्रॉनिक्सने दिले उत्तर, टि्वटरवर हास्यकल्लोळ

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांचे तीन सहकारी दिल्लीचे नायाब राज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयात सोमवारपासून आंदोलनाला बसले आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांचे तीन सहकारी दिल्लीचे नायाब राज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयात सोमवारपासून आंदोलनाला बसले आहेत. त्यामुळे अनिल बैजल त्यांच्या घरातूनच सर्व कामकाज करत आहेत. दिल्लीतल्या या राजकीय परिस्थितीबद्दल दिग्दर्शिका फराह खानचा नवरा शिरीष कुंदरने एक गंमतीशीर टि्वट केले. त्या टि्वटने सर्वांचेच भरपूर मनोरंज केले.

शिरीष कुंदरने या टि्वटमध्ये एलजी इंडियाला टॅग केले होते. त्यामुळे पुढची सर्व गंमत घडली. एलजी इंडिया तुमचे दिल्लीमध्ये सर्व्हीस सेंटर आहे का ? तिथे एलजी काम करत नाहीय आणि इतरांनाही काम करु देत नाहीय असे त्या टि्वटमध्ये म्हटले होते. खरंतर शिरीष कुंदरने दिल्लीच्या नायाब राज्यपालांना टोला मारला होता.

पण एलजी इलेक्ट्रॉनिक्सने ते टि्वट गांभीर्याने घेतले व लवकरच आम्ही मदत करु असे सांगितले. तुम्हाला जो त्रास झाला त्याबद्दल आम्हाला खेद आहे. तुम्ही तुमची माहिती लगेच आम्हाला मेसेजद्वारे कळवा. जेणेकरुन आमची मदत लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल. एलजी इंडियाच्या या तत्परतेनंतर टि्वटरवर एकच हास्यकल्लोळ सुरु झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2018 8:41 pm

Web Title: lg in delhi shirish kunder lg electronics twitter
Next Stories
1 हँड ग्रेनेड हातात फुटून काश्मीरमध्ये एकाचा मृत्यू
2 इंग्लंडचा भारताला दगा, स्टुडंट व्हिसा ही डोकेदुखीच
3 व्यापारात अमेरिकेची दादागिरी, भारत देणार जशास तसे उत्तर
Just Now!
X