News Flash

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदूंपासून भारताला मुक्त करु’

पाकिस्तानी सैन्य आणि सरकार हे आमचे शत्रू

बुरहान वानीनंतर जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाचा चेहरा म्हणून झाकीर मुसाची ओळख आहे.

‘गायींची पूजा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदूंपासून भारताला मुक्त करु’ असा धमकीवजा इशारा अल- कायदाचा काश्मीरमधील प्रमुख झाकीर मुसाने दिला आहे. जम्मू-काश्मीरमधील रोहिंग्या मुस्लिमांवर कारवाई करु नये असेही मुसाने म्हटले आहे.

झाकीर मुसाने बकरी- ईदच्या पार्श्वभूमीवर मुस्लिमांसाठी एक ऑडियो क्लिप जाहीर केली आहे.’टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार यात मुसाने नरेंद्र मोदी, हिंदू आणि जम्मू- काश्मीर याविषयावर भाष्य केले. देशभरात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या सुमारे ४० हजार रोहिंग्या मुस्लिमांना पुन्हा मायदेशी पाठवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यातील सहा हजार रोहिंग्या मुस्लिम हे जम्मूत राहतात. या निर्णयाचा झाकीर मुसाने विरोध दर्शवला. यानंतर तो थेट मोदींवर घसरला.

‘नरेंद्र मोदी आणि सर्व हिंदू एकत्र आले तरी ते आम्हाला रोखू शकत नाही. आम्ही भारतावर इस्लामचा झेंडा फडकावणारच आणि हिंदूंची देशातून हकालपट्टी करु’ असे चिथावणीखोर विधानही त्याने केले आहे. काश्मीरमधील जिहाद विरोधात पाकिस्तानने भारताशी हातमिळवणी केली आहे. पाकिस्तानने जिहाद-ए-काश्मीरच्या पाठीत खंजीर खूपसला. पाकिस्तानी सैन्य आणि सरकार हे आमचे शत्रू आहेत असे त्याने म्हटले आहे. अमेरिकेला मदत करुन पाकिस्तानने काश्मीरमधील जिहादींना दगा देत दहशतवादी तळ बंद केले असून काही दहशतवाद्यांना तुरुंगात पाठवले असा दावाही त्याने केला. झाकीर मुसाच्या क्लिपची जम्मू-काश्मीर पोलिसांनी दखल घेतली आहे. या क्लिपची चौकशी सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले. ‘अल्लाह’मुळेच जम्मू-काश्मीरमध्ये जिहादी यशस्वी ठरले असेही त्याने नमूद केले.

ओसामा बिन लादेनची ‘अल-कायदा’ ही दहशतवादी संघटना आता भारतातील जम्मू-काश्मीरमध्ये सक्रीय झाली आहे. हिज्बुल मुजाहिद्दीनचा माजी कमांडर झाकीर मुसा अल- कायदात दाखल झाला असून त्याच्याकडे जम्मू-काश्मीर विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. झाकीर मुसाने यापूर्वीही भारतविरोधी विधान करुन जम्मू-काश्मीरमधील तरुणांची माथी भडकवण्याचे काम केले होते. फुटिरतावाद्यांची भरचौकात हत्या केली पाहिजे असे विधान केल्याने त्याची ‘हिज्बुल’मधून काढून टाकण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2017 10:01 am

Web Title: liberate india from cow worshipping pm narendra modi hindus threatens al qaeda kashmir cell chief zakir musa
Next Stories
1 Video: या ‘आधुनिक श्रावण बाळाची’ कथा आणि व्यथा वाचून तुमच्या डोळ्यात पाणी येईल!
2 ‘हार्वे’ चक्रीवादळातील मृतांचा आकडा ३८
3 मंत्रिमंडळ फेरबदलाचा पहिला फटका रूडींना
Just Now!
X