लिबियातील नामधारी सरकारचे पंतप्रधान अब्दुल्ला अल थानी यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे.  विरोधी इस्लामी प्रशासनाची निर्मिती झाल्याने आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले
लिबियातील जनरल नॅशनल काँग्रेसने इस्लामवादी नवीन संसदेची घोषणा केल्यानंतर ओमर अल हासी यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार आले आहे. इस्लामी बहुल जनरल नॅशनल काँग्रेसने इस्लामी गटांनी केलेल्या आवाहनानंतर त्रिपोली येथे एक बैठक बोलावली होती त्यात त्यांनी अब्दुल्ला अल थानी यांचे सरकार बडतर्फ करून ओमर अल हासी हे सरकार स्थापन करतील असे जाहीर केल्याचे जीएनसीचे प्रवक्ते ओमर अहमीदन यांनी पत्रकारांना सांगितले.