डेहराडून : लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) गुरमित सिंग यांनी बुधवारी उत्तराखंडचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. राजभवनात झालेल्या एका साध्या समारंभात उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आर.एस. चौहान यांनी सिंग यांना पदाची शपथ दिली.

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी, उत्तराखंड विधानसभेचे अध्यक्ष प्रेमचंद अगरवाल, पोलीस महासंचालक अशोक कुमार व मुख्य सचिव एस.एस. संधू यांच्यासह अनेक वरिष्ठ सरकारी अधिकारी यावेळी हजर होते. ले.ज. सिंग हे बेबी रानी मौर्य यांच्या जागी आले आहेत. मौर्य यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या तीन वर्षे आधीच राजीनामा दिला होता.

भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून निवृत्त झालेले सिंग यांनी लष्करी सेवेत अनेक पदके मिळवली होती. ते भारत- चीन व्यवहारांचे तज्ज्ञ मानले जातात.