आंग ली यांच्या ‘लाइफ ऑफ पाय’ या चित्रपटाला आज (सोमवार) ७० व्या गोल्डन ग्लोब्स पुरस्कार सोहळ्याच सर्वश्रेष्ठ ‘मूळ’ चित्रपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर ब्रिटिश गीतकार एडले यांनी जेम्स बॉन्ड चा सुपरहिट चित्रपट ‘स्कायफॉल’ च्या थीम ट्यून साठी हा पुरस्कार जिंकला.
भारतीय चित्रपट ‘लाइफ ऑफ पाय’ साठी मायकल डाना यांना ‘बेस्ट ओरीजनल मोशन पिक्चर’ साठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांना जेसन स्टैथम आणि जेनिफर लोपेज यांनी प्रदान केला. बेव्हरली हिल्स येथील बेव्हरली हिल्टन हॉटेलमध्ये ७० वा गोल्डन ग्लोब पुरस्काराचा कार्यक्रम पार पडला.   
या श्रेणीसाठी डेरियो मैरियानेली यांची ‘अन्ना कैरेनीना’, अलेग्जेंडर डेस्प्लैट की ‘आर्गो’, जॉन विलियम्स की ‘लिन्कोन’ आणि टॉम ट्वेकवेर, जॉनी क्लाइमेक तसेच रीनहोल्ड हीलची  ‘क्लाउड एटलस’ यांनाही नामांकन मिळाले होते.
चित्रपटाचे दिग्दर्शक ली यांच्यासोबत पुरस्कार घेणा-या डाना यांनी म्हटले, ‘धन्यवाद फॉक्स, ह्या चित्रपटाला बनवल्याचे सार्थक झाले’.
ऑक्टोबर महिन्यात आल्या मुलाला जन्म  देणारी एडले यानिमित्ताने पहिल्यांदाच कोणत्यातरी सोहळ्यात सहभागी झाली होती. ती म्हणाली, ‘हा पुरस्कार माझा प्रिय मुलगा आणि माझा प्रियकर सिमोन यांना मी समर्पित करते, ज्यांनी मला हे करण्यासाठी प्रेरणा दिली. विशेष म्हणजे मला पुरस्काराची आशाच नव्हती, असंही ती पुढे म्हणाली.