07 March 2021

News Flash

‘पंतप्रधानपदासाठी डझनभर कपडे शिवलेल्या नेत्यांची युती म्हणजे तिसरी आघाडी’

बिहारमधील पुर्णिया येथे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी आपल्या हुंकार रॅलीत देशवासीयांना होळीच्या शुभेच्छा देऊन येत्या निवडणुकांनंतर होळीच्या रंगांप्रमाणे देश भाजपच्या रंगात रंगून निघेल असा

| March 10, 2014 02:43 am

बिहारमधील पुर्णिया येथे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी आपल्या हुंकार रॅलीत देशवासीयांना होळीच्या शुभेच्छा देऊन येत्या निवडणुकांनंतर होळीच्या रंगांप्रमाणे देश भाजपच्या रंगात रंगून निघेल असा विश्वास व्यक्त केला.
तिसऱया आघाडीवर निशाणा साधत पंतप्रधानपदाची अपेक्षा ठेवून पंतप्रधान झाल्यानंतरचे डझनभर कपडे शिवून ठेवलेल्या नेत्यांची तिसऱी आघाडी असल्याची तिखट टीका मोदींनी यावेळी केली. तसेच देशात दहशतवाद, उत्तरप्रदेशात झालेले दंगे, मध्यान्ह भोजनामुळे विषबाधा होऊन बालकांचा मृत्यू होतो यावेळी तिसरी आघाडी कुठे होती. केवळ निवडणुकींच्या तोडांवर ही तिसरी आघाडी डोके वर काढते ही आघाडी काय देशाचा विकास साधणार? असा सवालही मोदींनी यावेळी उपस्थित केला.
नितीश कुमारांना लक्ष्य करत पंतप्रधानपदाच्या अपेक्षेनेच नितीश कुमारांनी भाजपशी काडीमोड घेतल्याचे नरेंद्र मोदींनी म्हटले. तसेच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयार झालेल्या विविध आघाड्यांनी यावेळी काँग्रेसला वाचविण्यासाठीचेच प्रयत्न आजवर केले असल्याचेही मोदी म्हणाले.
काँग्रेसचे युवराज (राहुल गांधी) म्हणतात, काँग्रेसने प्रत्येक नागरिकाच्या हातात मोबाईल दिला. परंतु, त्या मोबाईल फोन्सला चार्ज करण्यासाठी विज कोण देणार? असा सवाल उपस्थित करत मोदींनी काँग्रेसवरही निशाणा साधला. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आकाश टॅबलेट देण्याच्या घोषणाही काही नेत्यांनी केल्या परंतु, माझा त्यांना प्रश्न आहे हा आकाश टॅबलेट पृथ्वीवर केव्हा येणार? अशी जळजळीत टीकाही मोदींनी यावेळी केली. 
मुस्लिम समाजाचा आडोसा घेऊन केंद्र सरकार आणि सेक्यूलर नितीचा दावा करणाऱया पक्षांनी देशातील मुस्लिम जनतेला फसविण्याचे काम केले असल्याचे म्हणत मोदींनी बिहार आणि गुजरातमधील मुस्लिम समाजाच्या प्रगतीची आकडेवारी जनतेसमोर मांडली.
मोदी म्हणतात, मुस्लिम समाजाच्या गरिबीची टक्केवारी बिहारमध्ये ४५ आहे, तर गुजरामध्ये फक्त २४ टक्के आहे. गुजरातमधील मुस्लिम समाजाच्या साक्षरतेचे प्रमाण ७४ टक्के आहे, तर बिहारमध्ये केवळ ४२ टक्के. बिहारमध्ये मुस्लिम समाजाच्या प्रत्येकी १००० नवजात बालकांमागे ७१ बालकांचा मृत्यू होतो, तर गुजरामध्ये हे प्रमाण ३४ टक्क्यापर्यंत आणण्यात भाजपला यश आले असल्याचे मोदी म्हणाले.

मोदी टीकास्त्र-
* पंतप्रधानपदाच्या स्वप्नामुळे त्यांना(नितीश कुमार) झोप येत नव्हती म्हणून भाजपशी त्यांनी काडेमोड घेतला.
* पंतप्रधानपदाची अपेक्षा ठेवलेल्या डझनभर नेत्यांची तिसरी आघाडी.
* केवळ निवडणुकांच्या तोंडावर तिसरी आघाडी जागी होते.
* राहुल गांधींनी देशातील जनतेच्या हातात मोबाईल दिल्याचा दावा केला. मोबाईला चार्ज करण्यासाठी विज कोण देणार?
* आकाश टॅबलेट धरतीवर केव्हा येणार?
* गुजरातची प्रगती पाहून काँग्रेसचा जळफळाट होतो. 
* मुस्लिम सजामाजाचा आडोसा घेऊन काँग्रेसने मतांचे राजकारण केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2014 2:43 am

Web Title: like holi bjp too spreading its colours modi
टॅग : Bjp,Loksabha
Next Stories
1 विमान बेपत्ता होण्यात दहशतवादी कृत्याची शक्यता
2 पंकज मिश्रा यांना येल विद्यापीठाचा पुरस्कार
3 ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेवर पुन्हा भारतीय मोहोर
Just Now!
X