वापरकर्त्यांच्या अभिव्यक्तीला जास्त वाव मिळावा यासाठी ट्विटरने १४० या वर्णमर्यादेत छायाचित्रे व चित्रिफती न धरण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे अनेक दिवस अफवा असलेली गोष्ट आज अखेर बातमी ठरली. संक्षिप्त संदेशासाठी प्रसिद्ध असलेल्या ट्विटर मायक्रोब्लॉिगग संकेतस्थळाने हा निर्णय जाहीर केला. गेली दहा वर्षे १४० वर्णाक्षरांची मर्यादा कायम होती. ट्विटरचे उत्पादन व्यवस्थापक टॉड शेरमन यांनी सांगितले की, आता लोकांना ट्विटरचा वापर अधिक मुक्तपणे करता येईल. छायाचित्रे, चित्रफिती वर्णाक्षर मर्यादेत धरणार नाही. येत्या काही महिन्यात या सुधारणा दिसतील. स्वत:चे संदेश रिट्विट किंवा कोट करण्याची सुविधा दिली जाणार आहे. सर्व अनुसारकांसाठी रिप्लाय ही सुविधा दिली जाणार आहे.