X
X
X

अमेरिकी हॉटेलनं अक्षरश: हाकललं, अनन्या बिर्लांना आला वर्णद्वेषी अनुभव

अत्यंत वाईट अनुभव होता असं त्यांनी म्हटलं आहे

आदित्य बिर्ला यांच्या कन्या अनन्या बिर्ला यांनी त्यांना आलेल्या वर्णभेदाचा अनुभव ट्विटरवर शेअर केला आहे. आम्हाला अमेरिकेतल्या हॉटेलने अक्षरशः हाकलून दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अनन्या बिर्ला यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की रेस्तराँ इटालियन रुट्सने मला आणि माझ्या कुटुंबीयांना आपल्या परिसरातून हाकलून दिले. हा वर्णभेद अत्यंत वेदनादायी आहे. तुम्हाला तुमच्या ग्राहकांसोबत योग्य पद्धतीने वागले पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे.

Scopa Italian Roots या रेस्तराँमध्ये मी माझ्या कुटुंबीयांसासोबत जेवायला गेले होते. मात्र तिथे गेल्यावर मला आणि माझ्या कुटुंबीयांना हाकलून दिलं. तुमच्या रेस्तराँमध्ये येणाऱ्या ग्राहकांसोबत वर्णभेद करण्याची ही पद्धत अत्यंत वेदनादायी आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

आम्हाला त्या रेस्तराँने अक्षरशः हाकलून दिलं असंही त्यांनी म्हटलं आहे. मला आणि माझ्या कुटुंबीयांना त्यांनी त्या रेस्तराँच्या परिसरातही थांबू दिलं नाही. आम्हाला सगळ्यांना जेवण करण्यासाठी तीन तास ताटकळत रहावं लागलं. तरीही आम्ही रेस्तराँमध्ये थांबलो होतो. नीरजा बिर्ला यांचा मुलगा आणि क्रिकेटर आर्यमान बिर्ला यांनीही याप्रकरणी ट्विट करत अत्यंत वाईट अनुभव आल्याचं म्हटलं आहे. सोशल मीडियावर या प्रकरणी प्रतिक्रिया आणि मतं नोंदवली आहेत.

कोण आहेत अनन्या बिर्ला?
अनन्या बिर्ला आदित्या बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम यांची मुलगी आणि गायिका आहेत. अनन्या बिर्ला यांचे पहिले गाणे लिविन द लाइफ २०१६ मध्ये आले होते. त्यानंतर अनन्या बिर्ला युनिव्हर्सल म्युझिक इंडियाने सिंगर म्हणून साईन केलं. याशिवाय अनन्या बिर्ला या ई कॉमर्स कंपनी क्युरोकार्टच्या फाऊंडर आणि सीईओ आहेत.