News Flash

साहित्यिकांची संमेलनाकडे पाठ!

संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ज्येष्ठ साहित्यिक श्याम मनोहर यांचा सत्कार झाला. त्यां

संग्रहित प्रतिनिधिक छायाचित्र

बडोदेकर साहित्यरसिकांचा हिरमोड

तब्बल ८३ वर्षांनी होत असलेल्या साहित्य संमेलनामध्ये बडोदेकर साहित्यिकांची उत्सुकतेने वाट पहात होते, पण परिसंवादातील सहभागी लेखकांखेरीज फारसे साहित्यिक संमेलनाकडे न फिरकल्याने बडोदेकर रसिकांचा हिरमोड झाला.

बडोदा येथे यापूर्वी १९०९ मध्ये लेफ्टनंट कर्नल डॉ. कीर्तिकर यांनी, १९२१ मध्ये साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांनी तर, १९३४ च्या अखेरीस ना. गो. चापेकर यांनी ग्रंथकार संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. आता ८३ वर्षांनी बडोदेकरांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजकपदाचा बहुमान लाभला आहे. मात्र, परराज्यातील या संमेलनाकडे साहित्यिकांनी पाठ फिरवल्यामुळे साहित्यिकांचे स्वागत करण्यास उत्सुक असलेल्या बडोदेकरांच्या पदरी निराशा पडली.

संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ज्येष्ठ साहित्यिक श्याम मनोहर यांचा सत्कार झाला. त्यांचे मनोगत साहित्यरसिकांनी उत्सुकतेने ऐकले. ज्येष्ठ लेखक डॉ. हरिश्चंद्र थोरात, लेखिका मंगला गोडबोले, मोनिका गजेंद्रगडकर आणि अर्जुन डांगळे हे विविध परिसंवादात सहभागी झाले होते. मात्र, संमेलनामध्ये मोठय़ा संख्येने आलेल्या साहित्यिकांचे दर्शन घडेल या प्रतीक्षेत असलेल्या साहित्यरसिकांचा अपेक्षाभंग झाला.

भाषण उत्तम, पण वाङ्मयीन विचारांचे काय?

लक्ष्मीकांत देशमुख यांचे अध्यक्षीय भाषण उत्तम झाले हे निर्विवाद सत्य असले तरी या भाषणातून वाङ्मयीन विचार किती स्पष्ट झाले याबद्दल प्रश्न आहे, अशी भावना ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले आणि चिपळूण येथील साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी व्यक्त केली.संमेलनात बडोदेकर रसिकांचा उत्साह पाहावयास मिळाला. देशमुख यांचे अध्यक्षीय भाषण छान झाले. पण या भाषणातून वाङ्मयीन विचार फारसा पुढे गेला नाही, असे म्हणता येऊ  शकते, असे मंगला गोडबोले यांनी सांगितले. अर्थात गेल्या काही वर्षांतील अध्यक्षीय भाषणातून हे घडले का, हा प्रश्न पडतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.अध्यक्षीय भाषणात साहित्यातील बदलते प्रवाह, बदलते अवकाश याचे प्रतिबिंब पडेल ही अपेक्षा होती. त्या पातळीवर या भाषणाने निराशा केली, असे देशपांडे म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2018 4:49 am

Web Title: litterateur ignore 91th all india marathi sahitya sammelan in baroda
Next Stories
1 निर्भीड विचारांची सरकारला भीती
2 मराठी वाङ्मयाला इतिहास आहे, परंपरा नाही!
3 इराणचे अध्यक्ष रुहानी यांची भारताला भेट
Just Now!
X