26 October 2020

News Flash

डीडी नॅशनलवर आजपासून रामलीलाचे अयोध्येतून थेट प्रसारण

सिनेक्षेत्रातील दिग्गज साकारणार भूमिका

प्रातिनिधीक छायाचित्र

रामलीलाचा कार्यक्रम डीडी नॅशनल वाहिनीवर लाईव्ह प्रसारित केला जाणार आहे. १७ ते २५ ऑक्टोबरदरम्यान संध्याकाळी ७ वाजल्यापासून याचे थेट प्रसारण होणार आहे, अशी माहिती दूरदर्शन आणि डीडी न्यूजचे महासंचालक मयांक अग्रवाल यांनी दिली.

अग्रवाल यांनी ट्विट करीत म्हटलं की, १७ ते २५ ऑक्टोबर दरम्यान डीडी नॅशनलवर संध्याकाळी ७ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत अयोध्येतून रामलीला कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता डीडी भारतीवरुन तर दुपारी ३ वाजता डीडी नॅशनलवरुन या कार्यक्रमाचे पुनःप्रसारण केले जाणार आहे.

रवि किशन, मनोज तिवारी, आसरानी, विंदू दारासिंह, रझा मुराद या सिनेक्षेत्रातील दिग्गजांसह इतर अनेक प्रसिद्ध कलाकार यामध्ये भूमिका साकारणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 1:02 pm

Web Title: live broadcast of ramlila from ayodhya on dd national from today aau 85
Next Stories
1 मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी मेजर रमेश उपाध्याय जेडीयूत दाखल
2 “भारतातील गरीब भुकेला आहे कारण…,” राहुल गांधींनी मोदी सरकारवर साधला निशाणा
3 शबरीमला मंदिर भाविकांसाठी खुलं, दिवसाला २५० भक्तांना प्रवेश; जाणून घ्या काय आहेत अटी…
Just Now!
X