07 March 2021

News Flash

मोहन भागवत यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण

गेल्या वर्षीही दूरदर्शनने भागवत यांचे भाषण प्रक्षेपित केले होते

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांचे दसरा संमेलनात गुरुवारी नागपूर येथे होणारे भाषण दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपित केले जाणार आहे. गेल्या वर्षीही दूरदर्शनने भागवत यांचे भाषण प्रक्षेपित केले होते, त्यावर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली होती. मात्र आपण वृत्तमूल्याच्या आधारावरच हे भाषण प्रक्षेपित करीत असल्याचा दावा दूरदर्शनने केला होता.

विहिंपची हेल्पलाईन
नागपूर: विश्व हिंदू परिषदेने खास हिंदूंसाठी नवीन हेल्पलाईन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात अल्पसंख्यक अडचणीत असताना विश्व हिंदू परिषदेने हा कार्यक्रम उद्या गुरुवारी दुपारी १२.३० वाजता शहरातील महालमधील न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये आयोजित आयोजित केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2015 3:37 am

Web Title: live telecast of mohan bhagwats speech
Next Stories
1 हिवाळी अधिवेशन सरकारला जड!
2 स्कॉर्पिन पाणबुडी खरेदीत दलाली नाही
3 पीटर मुखर्जीच्या माजी कर्मचाऱ्याचा शोध जारी
Just Now!
X