बिहारमध्ये कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडली असून, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी लोकजनशक्ती पक्षाने (लोजप) रविवारी केली. याबाबत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रामनाथ कोविंद यांची भेट घेतल्यानंतर लोजपने नितीशकुमार यांच्या सरकारला लक्ष्य केले.
भाजपचे बिहार प्रदेश उपाध्यक्ष विश्वेश्वर ओझा यांची शुक्रवारी भोजपूर जिल्ह्य़ात गोळय़ा घालून हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) चौकशी करण्याची मागणीही लोजपने केली.
याप्रकरणी लोजपचे नेते रामविलास पासवान यांच्या अध्यक्षतेखालील पक्षाच्या शिष्टमंडळाने गृहमंत्री राजनाथ सिंह यांचीही भेट घेतली.