पूंछमधील हल्ला ताजा असतानाच काल शुक्रवार रात्री दहाच्या सुमारास पूंछमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला.
भारतीय सैनिकांनीही गोळीबाराला चोख उत्तर दिले. दरम्यान, गोळीबारात कोणत्याही प्रकराची जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. पूंछमधील सरला छावणीवर सोमवारी रात्री पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात भारतीय लष्करातील पाच जवान शहीद झाले होते. या घटनेमुळे दोन्ही देशातील तणाव वाढला असतानाही सीमेपलीकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. तब्बल साडेसात तास हा गोळीबार झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता या सर्व प्रकरणावर भारत कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 10, 2013 11:11 am