दहशतवादाला आमचा पाठिंबा नाही, आम्ही स्वत:च दहशतवादाच्या समस्येचे बळी आहोत, असा कांगावा करणाऱ्या पाकिस्तानचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले आहे. पाकिस्तान सरकार दहशतवाद्यांना पोसत असल्याचा आरोप करत पाकव्याप्त काश्मीरमधील जनेतेने गुरूवारी आंदोलन छेडले. सरकारने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ बंद केले नाही तर आम्ही कारावाई करू, असा इशाराच येथील स्थानिक नागरिकांनी दिला आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद, कोटली, चिनारी, मीरपूर, गिलगिट, दायमर आणि नीलम खोऱ्यात दहशतवाद्यांचे अनेक तळ आहेत. येथील दहशतवाद्यांना स्थानिक प्रशासनाकडून अन्नधान्यासह सर्व आवश्यक वस्तूंचा पुरवठा केला जातो. या दहशतवादी अड्ड्यांमुळे नागरिकांना काही भागांमध्ये जाण्यास मज्जावही करण्यात आला आहे. आम्ही या सगळ्याचा निषेध करतो. दहशतवादाचा नि:पात झालाच पाहिजे. दहशतवाद्यांना आसरा देऊन ही समस्या कधीच सुटणार नाही, असे सांगत नागरिकांनी जोरदार आंदोलन केले. यावेळी पाकिस्तानी नागरिक सरकारविरोधी घोषणा देत होते.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याविरोधात आंदोलन
काही दिवसांपूर्वीच पाकव्याप्त काश्मीरमधील कोटली येथील नागरिकांनी पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआय या गुप्तचर यंत्रणेने केलेल्या अत्याचाराविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन केले होते. बनावट चकमक आणि स्वातंत्र्याची मागणी करणा-या नेत्यांवरील अमानूष कारवाईच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील १५ ऑगस्टच्या भाषणात पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तानमधील पाक सैन्याच्या अत्याचाराचा मुद्दा मांडून पाकिस्तानवर निशाणा साधला होता.
बलुचिस्तानात मोदींचे वारे, पाक विरोधात फडकला तिरंगा