काश्मीरमधील हांडवारा येथे एका मुलीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणात एकास अटक करण्यात आली आहे. या कथित घटनेनंतर काश्मीरमध्ये िहसाचारात पाच जण सुरक्षा दलांच्या गोळीबारात ठार झाले होते. हिलाल अहमद बंदे असे दोनपकी एका आरोपीचे नाव असून त्याला जम्मू-काश्मीर पोलिसांनी रात्री हांडवारा येथे अटक केली. विनयभंग झालेल्या मुलीने ज्या दोघांची नावे सांगितली, त्यात त्याचा समावेश आहे. पीडित मुलीने मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर जबाब दिला होता त्यात तिने दोन जणांची नावे सांगितली होती. हांडवारा येथे सार्वजनिक प्रसाधनगृहातून ही मुलगी बाहेर पडली असता १२ एप्रिल रोजी दोन जणांनी मुलीचा विनयभंग केला होता. सदर मुलीने आधी विनयभंग झालाच नव्हता असे म्हटले होते पण नंतर पोलिसांनी दडपणाखाली तसा जबाब घेतल्याचे सांगण्यात आले. मुलीने लष्कराच्या जवानांनी विनयभंग केला नाही, असे सांगितले आहे. तिने दिलेल्या जबाबनुसार ती शाळेतून घरी जात असताना दोन मुलांनी तिच्याशी झटापट केली व तिची बॅगही हिसकावली. एक मुलगा शाळेच्या गणवेशात होता. जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुलगी व तिच्या वडिलांना मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांपुढे उपस्थित करण्यात आले.

बंकर्स काढले
दरम्यान, लष्कराचे हांडवारातील तीन बंकर्स काढण्यात आले आहेत. तेथील लोकांनी मुलीच्या विनयभंगाचे कारण काढून सुरक्षा दलांवर जी दगडफेक केली, त्यात बंकर्स काढले जावेत, हा मुख्य हेतू होता.मंगळवारी सकाळी बाजारपेठ भागातील बंकर्स पालिका अधिकाऱ्यांनी काढून टाकले.