14 August 2020

News Flash

कर्फ्यू असतानाही रस्त्यावर फिरणाऱ्या आरोग्यमंत्र्यांच्या मुलाला रोखलं, महिला पोलीस कर्मचाऱ्यावर बदलीची कारवाई

“मी वर्षभर याच ठिकाणी तुला उभं राहण्यास भाग पाडू शकतो”, कारवाई करणाऱ्या महिला पोलिसाला आमदाराच्या मुलाची धमकी

करोनाच्या पार्श्वभूमीवर कर्फ्यू जाहीर करण्यात आलेला असतानाही आपल्या मित्रांसोबत फिरणाऱ्या आरोग्यमंत्र्यांच्या मुलावर कारवाई करण्यात आल्याने महिला पोलीस कर्मचाऱ्याची बदली करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. सूरतमध्ये ही घटना घडली असून यानंतर मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला आहे. पोलीस राजकीय दबाबाखाली काम करत असल्याची टीका होऊ लागली असून याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. पीटीआयने यासंबधी वृत्त दिलं आहे.

राज्य आरोग्यमंत्री आणि आमदार कुमार कनानी यांचा मुलगा प्रकाश कनानी आणि त्याच्या मित्रांनी रोखण्यात आल्यामुळे कॉन्स्टेबल सुनीता यादव यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. घटनेचा व्हिडीओ रविवारी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लॉकडाउनच्या नियमांचं उल्लंघन करत असल्याने सुनीता यादव यांनी प्रकाश याच्या मित्रांना रोखलं. यानंतर त्यांनी प्रकाश याला फोन करुन बोलावून घेतलं. प्रकाश आपली कार घेऊन घटनास्थळी पोहोचला होता. यानंतर त्याने सुनीता यादव यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. “मी वर्षभर याच ठिकाणी तुला उभं राहण्यास भाग पाडू शकतो,” अशी धमकीही यावेळी त्याने दिली. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त होऊ लागला होता.

यावेळी सुनीता यादव यांनीही आपण तुमची गुलाम नसल्याचं उत्तर दिलं. हा वाद समोर आल्यानंतर सुनीता यादव यांची पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. रविवारी प्रकाश आणि त्याच्या मित्रांना अटक करण्यात आली होती. पण नंतर त्यांनी जामिनावर सोडण्यात आलं. सुरतच्या पोलीस आयुक्तांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान घटनेनंतर सुनीता यादव सुट्टीवर गेल्या असून यावर त्यांनी अद्याप कोणतंही भाष्य केलेलं नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2020 9:27 am

Web Title: lockdown gujarat cop who stopped mlas son transferred sgy 87
Next Stories
1 पंतप्रधान नरेंद्र मोदी सूडाचं राजकारण करतात, शरद पवारांचा आरोप
2 “सर्व विरोधकांनी एकत्र येऊन देशातील जनतेला राजकीय पर्याय उपलब्ध करुन देणं ही राष्ट्रीय गरज”
3 “प्रियंका गांधींना निवासस्थान सोडायला सांगणं हे मोदी सरकारचं क्षुद्र राजकारण”
Just Now!
X