09 August 2020

News Flash

अकोल्यात १८ ते २० जुलैदरम्यान टाळेबंदी

पालकमंत्री बच्चू कडू यांची घोषणा; कडक निर्बंध ठेवण्याचे निर्देश

(संग्रहित छायाचित्र)

लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : करोना संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाने लागू केलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करावी. पुढील आठवड्यात १८ ते २० जुलै दरम्यान तीन दिवस संपूर्ण टाळेबंदी पाळाण्याचे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी प्रशासनाला दिले.

करोना संदर्भात जिल्ह्यातील सद्यास्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस आ. नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक जी.श्रीधर आदींसह अधिकारी उपस्थित होते. महानगरात करोना संसर्गाचा प्रसार कमी होत असला तरी ग्रामीण भागात वाढत असल्याबाबत पालकमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली. त्यासाठी ग्रामीण भागातून व शहरातून होत असलेल्या वाहतुकीसंदर्भात घालून दिलेल्या निर्बंधाची कडक अंमलबजावणी करा.

विनाकारण ये-जा होता कामा नये, असे निर्देश बच्चू कडूंनी दिले. ग्रामीण तसेच शहरी भागात सामाजिक अंतराचे पालन होतांना दिसत नाही. तसेच विनाकारण व मुखपट्टी विना अनेक लोक फिरतांना दिसतात. त्यामुळे संसर्ग पसरण्याचा धोका वाढतो. जिल्ह्यााची नाकाबंदी अधिक कडक झाली पाहिजे. बाहेरुन आलेल्या प्रत्येक व्यक्तीची नोंद घेतली जाऊन त्यांची वैद्याकीय तपासणी करा, त्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात नाकाबंदी व जमावबंदीच्या निर्बंधांचे काटेकोरपणे अंलबजावणी करा, असे निर्देश ना.कडू यांनी प्रशासनाला दिले. तसेच पुढच्या आठवड्यात १८ ते २० तीन दिवस संपूर्ण टाळेबंदी पाळा, असेही ते म्हणाले.

करोनासोबतच आता पावसाळ्यात साथीच्या आजारांचा फैलाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील विविध ठिकाणी साचलेल्या पाण्याच्या डबक्यांवर फवारणी करून डासांचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उपाययोजना करा. रुग्णालये व अन्य ठिकाणी स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाºयाविरूद्ध कारवाई करा, असेही त्यांनी सांगितले.

तीनचाकी सायकलचे वाटप
पालकमंत्री बच्चू कडू यांच्याहस्ते आज दिव्यांग लाभार्थ्यांना तीन चाकी सायकलचे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दुपारी हा कार्यक्रम पार पडला. ज्ञानेश्वर रमेश ठाकरे व राहुल अरविंद शाह या दोन दिव्यांग लाभाथ्र्यांना सायकल वाटप करण्यात आले.
कावड महोत्सवाचा समन्वयाने निर्णय घ्या

७६ वर्षांची परंपरा असलेला श्रीराजराजेश्वार कावड व पालखी महोत्सव यंदा करोना विषाणू संसर्गाच्या पाश्र्वाभूमिवर कशा पद्धतीने साजरा करावा व परंपरेचे पालन कसे करावे याबाबत राजराजेश्वार मंदिर समिती, कावड व पालखी मंडळे यांनी समन्वयाने निर्णय घेऊन प्रशासनाकडे प्रस्ताव द्याावा, असे आवाहन पालकमंत्री बच्चू कडू यांनी केले. या संदर्भात त्यांनी आढावा बैठक घेतली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2020 9:52 pm

Web Title: lockdown in akola till 18th to 20th july scj 81
Next Stories
1 मोठा दिलासा: देशभरात पाच लाखांपेक्षा जास्त रुग्णांची करोनावर मात
2 “गेहलोत सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून घोडेबाजाराचा प्रयत्न”; काँग्रेस आमदारांचा गंभीर आरोप
3 सीमेपलीकडून ३०० दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत; लष्कराची माहिती
Just Now!
X