13 August 2020

News Flash

“हे यश नाही तर आमच्या सरकारने केलेली निराशा आहे”, ओमर अब्दुल्लांचं इवांका ट्रम्प यांना उत्तर

इवांका ट्रम्प यांनी वडिलांना सायकलवर बसलून १२०० किमी अंतर पार करणाऱ्या ज्योती कुमारीचं कौतुक केलं आहे

लॉकाउनमुळे एकीकडे स्थलांतरित मजूर पायी तसंच मिळेल त्या मार्गाने आपल्या घरी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. यादरम्यान १५ वर्षीय ज्योती कुमारीचं नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ज्योती कुमारीने आपल्या आजारी वडिलांना सायकलवर बसून सात दिवसांत तब्बल १२०० किमी अंतर प्रवास केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प यांनीदेखील ज्योती कुमारीच्या या अशक्यप्राय अशा कामगिरीची दखल घेतली आहे. इवांका यांनी आपल्या ट्विटरला ज्योती कुमारीची बातमी शेअर करत कौतुक केलं आहे. दरम्यान जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री इवांका ट्रम्प यांच्या ट्विटला उत्तर दिलं आहे.

ओमर अब्दुल्ला यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “ज्योती कुमारीने जणू काही आनंद म्हणूनच १२०० किमी सायकल चालवली अशा पद्धतीने तिच्या गरीबी आणि जिद्दीचा गौरव केला जात आहे. सरकारने तिची निराशा केली आहे. त्यामुळे मोठं यश मिळालं म्हणून जाहीर कऱण्यासारखी ही गोष्ट नाही”.

आणखी वाचा- मुलीने आजारी वडिलांना सायकलवर बसवून पार केलं १२०० किमी अंतर, इवांका ट्रम्पही भारावल्या

ज्योती कुमारी लॉकडाउन जाहीर होण्याआधी गुरुग्राम येथे वास्तव्यास होती. ज्योतीचे वडील मोहन पासवान गुरुग्राममध्ये रिक्षा चालवत होते. लॉकडाउन काळात एका छोट्या अपघातात ते जखमी झाल्यामुळे त्यांचा रोजगार तुटला. आजारी वडिलांना कोणत्याही परिस्थितीत बिहारला आपल्या गावी न्यायाचं असल्याने अखेर तिने सायकवरुन वडिलांनी नेण्याचा निश्चय केला. इतकंच नाही तर सात दिवसांत तिने १२०० किमीचा टप्पा गाठत वडिलांना सुखरुप घरी पोहोचवलं.


ज्योती कुमारीची कहाणी ऐकल्यानंतर सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने ज्योतीला चाचणीसाठी बोलावलं आहे. “ज्योतीने Trials यशस्वीपणे पूर्ण केली, तर Nation Cycleing Academy च्या कॉम्प्लेक्स मध्ये Trainee म्हणून तिची निवड होऊ शकते.” सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष ओंकार सिंह यांनी पीटीआयला माहिती दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2020 3:27 pm

Web Title: lockdown omar abdullah anser to ivanka trump tweet over jyoti kumari who cycled 1200 km sgy 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 “राहुल गांधींचा व्हिडीओ म्हणजे निव्वळ नाटक, मजुरांच्या हाल अपेष्टांना काँग्रेसच जबाबदार”
2 “महाराष्ट्रात अन्न मिळालं, पण उत्तर प्रदेशात काहीही दिलं नाही”, स्थलांतरित मजुराने मांडली व्यथा
3 …अखेर हाँगकाँगसाठी चीनने भारताकडे मागितली मदत
Just Now!
X