Lok Sabha Election 2019 South India Live : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला गुरुवारी सकाळी आठ वाजता सुरुवात झाली होती. परंतु आता चित्र स्पष्ट झाले असून पुन्हा एकदा भाजपाला सरकार स्थापन करण्याची संधी मिळणार आहे.

ओदिशामध्ये लोकसभेच्या 21 जागा असून या ठिकाणी बीजेडीला अधिक जागांवर आघाडी मिळत असली तरी भाजपाचा जोरही वाढताना दिसत आहे.

 

Live Blog

लोकसभा निवडणूक 2019 चे सर्व लाईव्ह अपडेट इथे वाचा

13:21 (IST)23 May 2019
भाजपा 9 जागांवर आघाडीवर

1 वाजेपर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार ओदिशामध्ये भाजप 9 जागांवर आघाडीवर आहे. ओदिशामध्ये चार टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली होती.
 

11:52 (IST)23 May 2019
भाजपाचे जय पांडा पिछाडीवर
11:40 (IST)23 May 2019
संबित पात्रा 700 मतांनी आघाडीवर
11:32 (IST)23 May 2019
ज्युएल ओराम आघाडीवर

केंद्रीय मंत्री ज्युएल ओराम जॉर्ज तिर्की मतदारसंघातून आघाडीवर. बीजेडी 13, भाजपा 7 आणि काँग्रेस एका जागेवर आघाडीवर.

11:32 (IST)23 May 2019
ज्युएल ओराम आघाडीवर

केंद्रीय मंत्री ज्युएल ओराम जॉर्ज तिर्की मतदारसंघातून आघाडीवर. बीजेडी 13, भाजपा 7 आणि काँग्रेस एका जागेवर आघाडीवर.

11:30 (IST)23 May 2019
भुवनेश्वरहून अपराजिता षडंगी आघाडीवर

भुवनेश्वर लोकसभा जागेवरून भाजपाच्या उमेदवार अपराजिता षडंगी, ढेंकानाल लोकसभेच्या जागेवर भाजपा उमेदवार रूद्र नारायण पाणी, बलांगीरहून संगीता सिंहदेव यांची आघाडी. तर कोरापुटहून भाजपाचे जयराम पांगी, बरहमपुरवरून बीजेडीचे चंद्रशेखर साहू, नवरंगपूरहून बीजेडीचे रमेश माझी आघाडीवर.

11:12 (IST)23 May 2019
बीजेडीच्या प्रमिला बिसोयी आघाडीवर
बीजेडीच्या उमेदवार प्रमिला बिसोयी विरूद्ध भाजपाच्या अनिता सुभाषदर्शी असा सामना रंगत आहे. प्रमिला बिसोयी या 852 मतांनी आघाडीवर.
 
10:57 (IST)23 May 2019
बीजेडी 12 जागांवर आघाडीवर

काळी वेळापूर्वी ओदिशामध्ये भाजपाने आघाडी घेतली होती. परंतु आता पुन्हा एकदा बीजेडीने मुसंडी मारली असून 12 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपाला 6 आणि काँग्रेसला एका जागेवर आघाडी मिळाली आहे.

09:56 (IST)23 May 2019
ओदिशामध्ये भाजपा आघाडीवर

ओदिशामध्ये भाजपा 12 जागांवर आघाडीवर, तर बीजेडी 7 जागांवर आघाडीवर

09:53 (IST)23 May 2019
जुएल ओराम आघाडीवर

बिजपूर मतदारसंघातून बीजेडीचे जुएल ओराम आघाडीवर

09:50 (IST)23 May 2019
भाजपाचे संबित पात्रा पिछाडीवर

पुरी लोकसभेच्या जागेवरून भाजपचे संबित पात्रा पिछाडीवर

09:39 (IST)23 May 2019
सुरूवातीच्या कलांमध्ये बीजेडीला आघाडी

सुरूवातीच्या कलांमध्ये ओदिशातील बीजेडीला आघाडी. बीजेडी 11, भाजपा 3 आणि काँग्रेस 2 जागांवर आघाडीवर