News Flash

नरेंद्र मोदी वाराणसी, अमित शाह गांधीनगर तर गडकरींना नागपूरमधून उमेदवारी

विशेष म्हणजे भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या मतदारसंघातून अमित शाह यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

संग्रहित छायाचित्र

लोकसभेसाठी भाजपाची पहिली यादी जाहीर झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा वाराणसी मतदारसंघातून उभे राहणार आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना गांधीनगर तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपूर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते जे पी नड्डा यांनी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. भाजपाने आपल्या पहिल्या यादीत १८२ उमेदवारांची नावे जाहीर केली. विशेष म्हणजे भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या मतदारसंघातून अमित शाह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर  केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या पुन्हा एकदा अमेठी मतदारसंघातून उभ्या राहणार आहेत. हा मतदारसंघ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचा बालेकिल्ला आहे. गत निवडणुकीत या मतदारसंघातून इराणी यांचा पराभव झाला होता.

 

भाजपाच्या काही प्रमुख उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:

लखनौ- राजनाथ सिंह

गाझियाबाद- व्ही के सिंह

मथुरा- हेमामालिनी

उन्नाव- साक्षी महाराज

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2019 7:40 pm

Web Title: lok sabha election 2019 pm modi contest from varanasi amit shah gandhinagar nitin gadkari from nagpur candidates
Next Stories
1 चौकीदार नको, प्रामाणिक पंतप्रधान हवा आहे: असदुद्दीन ओवेसी
2 रामगोपाल यादव यांचं वक्तव्य घाणेरड्या राजकारणाचं उदाहरण – योगी आदित्यनाथ
3 विद्यार्थ्यांशी संवाद साधणे आचारसंहितेचे उल्लंघन नाही, राहुल गांधींना क्लीन चिट
Just Now!
X