लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची दुसरी, तिसरी आणि चौथी यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीत एक, तिसऱ्या यादीत ३६ उमेदवारांचा तर चौथ्या यादीत अकरा उमेदावारांचा समावेश आहे. समावेश आहे. ३६ जागांमध्ये आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, ओदिशा, आसाम आणि मेघालय या राज्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील सहा जागांचा यात समावेश असून जळगावमधून स्मिता वाघ, नांदेडमधून प्रताप चिखलीकर, दिंडोरीतून डॉ. भारती पवार, पुण्यातून गिरीश बापट, बारामतीतून कांचन कुल आणि सोलापूरमधून डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने गुरुवारी पहिली यादी जाहीर केली होती. पहिल्या यादीत १८४ उमेदवारांचा समावेश होता. तर शुक्रवारी रात्री दीव- दमण येथून लालूभाई पटेल यांना उमेदवारी जाहीर केली. तर काही वेळाने ३६ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. तिसऱ्या यादीत भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांना देखील स्थान मिळाले आहे. ओदिशामधील पुरी येथून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसऱ्या यादीत राज्यातील चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. यात पुण्यातील विद्यमान खासदार अनिल शिरोळे, सोलापूरचे शरद बनसोडे, जळगावचे ए. टी. पाटील आणि दिंडोरीचे हरिश्चंद्र चव्हाण यांचा समावेश आहे. जळगावमध्ये एकनाथ खडसे यांच्याऐवजी भाजपा पक्षश्रेष्ठींनी गिरीश महाजन यांच्या गटातील आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे.

शनिवारी दुपारी भाजपाने चौथी यादी जाहीर केली. यात चार राज्यांमधील ११ जागांचा समावेश आहे. चौथ्या यादीत तेलंगणातील ६, उत्तर प्रदेशमधील ३ आणि केरळ, पश्चिम बंगालमधील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे.

दरम्यान, ईशान्य मुंबईचे विद्यमान किरीट सोमय्या यांना उमेदवारी मिळणार का, हे अजूनही गुलदस्त्यात आहे. दुसऱ्या यादीतही ईशान्य मुंबईसाठी उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. ईशान्य मुंबईत विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्याऐवजी रेल्वेमंत्री पीयूष गोयल, मुंबई पालिकेतील नेते मनोज कोटक व आता प्रवीण छेडा यांच्याबरोबर गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता अशी अनेक नावे चर्चेत आली आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha elections 2019 bjp releases second list of 36 candidates girish bapat from pune
First published on: 23-03-2019 at 08:51 IST