02 July 2020

News Flash

निवडणूक काळात प्रचाराचे व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्यांना कोटींचा नफा

लोकसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांच्या प्रचाराची जबाबदारी सांभाळणाऱ्या सल्लागार कंपन्यांची सध्या चांगलीच चंगळ होताना दिसत आहे.

| April 18, 2014 06:20 am

लोकसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांच्या प्रचाराची जबाबदारी सांभाळणाऱ्या सल्लागार कंपन्यांची सध्या चांगलीच चंगळ होताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या प्रचाराची रणनीती ठरवण्याची मुख्य जबाबदारी या कंपन्यांच्या खांद्यावर असते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून अशाप्रकारच्या कंपन्यांना तब्बल ७०० ते ८०० कोटींचा नफा होणार असल्याचा अंदाज ‘असोचेम’ संघटनेच्या अभ्यासातून व्यक्त करण्यात आला. या अभ्यासानुसार सध्याच्या काळात सोशल मिडीयाच्या वाढत्या प्रस्थामुळे राजकीय पक्षांना लोकांपर्यंत पोहचण्यासाठी अशाप्रकारच्या विशेष संस्थांची मदत घ्यावी लागते.
एखाद्या मतदारसंघातील राजकीय पक्षाची असणारी व्होटबँक, निवडणूक जिंकण्यासाठी लागणारे मताधिक्य, मतदारसंघातील भागांची विस्तृत माहिती आणि प्रचार करताना विशेष लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता असलेले विभाग यांसारख्या अनेक घटकांचा निवडणुकांच्या माहितीचे विश्लेषण करताना या संस्थांकडून अभ्यास केला जातो. निवडणूक जिंकल्यांनतर मतदारसंघावरील आपली पकड कायम राखण्यासाठी या सल्लागार एजन्सीजची मदत घेतली जाते. याउलट पराभवाची कारणे शोधून आगामी काळात पक्षाची रणनीती ठरविण्यासाठीसुद्धा या एजन्सीजची मदत घेतली जात असल्याचे या अभ्यासातून समोर आल्याची माहिती ‘असोचेम’चे सचिव डी.एस. रावत यांनी दिली. भारतातील ५४३ मतदारसंघात राजकीय अशाप्रकारची सेवा पुरविणाऱ्या १५० लहान-मोठ्या सल्लागार एजन्सीज कार्यरत आहेत. राजकीय पक्षांच्या एखाद्या मतदारसंघातील प्रचाराचे व्यवस्थापन करण्यासाठी या एजन्सीजकडून एक लाख ते ५० लाख रूपये आकारले जातात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2014 6:20 am

Web Title: lok sabha elections poll managing consulting cos may earn rs 700 800 cr
Next Stories
1 खासगी कंपन्यांवरही ‘कॅग’ची देखरेख..
2 व्हिडिओ: रामदेवबाबांची भाजप उमेदवारासोबतची ‘आर्थिक’ चर्चा कॅमेरात कैद!
3 दक्षिण कोरियात बोट बुडाली
Just Now!
X