News Flash

संसदेत कामकाज नाहीच

चलनकल्लोळावरून सलग दुसऱ्या दिवशी गदारोळ, आरोप-प्रत्यारोप

विरोधी पक्षाच्या सदस्यांनी शुक्रवारी लोकसभेत घोषणाबाजी केली.

चलनकल्लोळावरून सलग दुसऱ्या दिवशी गदारोळ, आरोप-प्रत्यारोप

नोटाबंदीवरून सत्तारूढ आणि विरोधक पुन्हा एकमेकांविरुद्ध भिडल्याने शुक्रवारीदेखील संसदेचे कामकाज गदारोळामध्ये वाहून गेले. लोकसभा व राज्यसभेमध्ये औटघटकेचेही कामकाज होऊ शकले नाही.

कामकाज सुरू होताच विरोधकांनी लोकसभेत गोंधळाला सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहामध्ये उपस्थित राहिलेच पाहिजे, यासाठी विरोधक मोकळ्या जागेमध्ये आले. मग त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपचे सदस्यही सरसावले. ‘तुम्हाला कोणाला कामकाजामध्ये रस दिसत नाही. गोंधळ करून सभागृह बंद पाडायचे आहे,’ असे सभापती सुमित्रा महाजन म्हणत होत्या. पण त्यांच्याकडे कुणी लक्ष दिले नाही. कसाबसा एकच प्रश्न विचारला गेला. शेवटी त्यांनी बारा वाजेपर्यंत कामकाज स्थगित केले. नंतर मग दिवसभरासाठी सुट्टी देण्यात आली. दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी संसदेच्या आवारातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली.

राज्यसभेत असेच चित्र होते. बँकांसमोरील रांगेमधील मृत्यूंची तुलना उरी हल्लय़ाशी करणारे गुलाम नबी आझाद यांचे वादग्रस्त वाक्य जरी राज्यसभेच्या कामकाजातून वगळले असले तरी त्यांच्या माफीनाम्यावर भाजप आडून बसला होता. आणि त्यास आझाद कदापि तयार नव्हते. शेवटी तोडगा न निघाल्याने राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब झाली. त्यातच शुRवार असल्याने दोन्हीकडील सदस्यांना एकंदरीतच मतदारसंघात पळण्याची घाई होती. गोंधळ आणि त्यानंतरची तहकुबी त्यांच्या पथ्यावर पडली. या गडबडीत राज्यसभेतील स्थगन प्रस्तावावरील चर्चा पुन्हा एकदा अर्धवट राहिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2016 1:19 am

Web Title: lok sabha rajya sabha adjourned after opposition uproar on demonetization
Next Stories
1 बँकांमधील शाईची निवडणुकांत बाधा नको
2 खाते तेथेच आज नोटाबदल
3 ..तर देशात दंगली होतील!
Just Now!
X