मथुरा मतदार संघातून भाजपकडून हेमा मालिनी निवडणूक लढवत आहेत. आता हेमा मालिनीविरोधात डान्सर सपना चौधरी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

सपना चौधरी काँग्रेस पक्षाच्या काही बड्या नेत्यांच्या संपर्कात असून ती मथुरा मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं जात आहे. सपनाचा उत्तर भारतात मोठा चाहता वर्ग आहे त्यामुळे याचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो असं म्हटलं जात आहे.  हेमा मालिनी आणि सपना चौधरी हे दोन्ही लोकप्रिय चेहरे आहेत त्यामुळे जर काँग्रेसनं सपनाला संधी दिली तर दोघींमध्ये जिंकण्यासाठी मोठी चुरस पाहायला मिळेल. मथुरा मतदार संघातील जाट समाजाला आकर्षित करून घेण्यासाठी काँग्रेसला सपना चौधरी मदत करणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. सपना चौधरी काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवणार या वृत्ताला पक्षाकडून अद्यापही अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

मात्र सपना हेमा मालिनी यांच्याविरोधात निवडणूक लढवणार अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. ११ एप्रिल ते १९ मे दरम्यान देशात सात टप्प्यात मतदान होणार आहे तर २३ मे रोजी मतदानाचे निकाल जाहीर होणार आहेत.