22 July 2019

News Flash

अपना दल नाही सोडणार भाजपाची साथ, आघाडीची घोषणा

अपना दल भाजपाची साथ सोडणार नसून आगामी लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार आहेत.

अपना दल भाजपाची साथ सोडणार नसून आगामी लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी टि्वटरवरुन ही माहिती दिली. ‘फिर एक बार मोदी सरकार’चा संकल्प समोर ठेऊन उत्तर प्रदेशात भाजपा आणि अपना दल एकत्र निवडणूक लढणार आहेत.

उत्तर प्रदेशात भाजपाने अपना दलला दोन जागा सोडल्या असून अनुप्रिया पटेल या मिर्जापूरमधून निवडणूक लढणार आहेत. सध्या त्या मिर्जापूरमधूनच खासदार आहेत. अपना दलला दुसरी कुठली जागा द्यायची त्यावर दोन्ही पक्ष लवकरच निर्णय घेतील असे अमित शाह यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

अनुप्रिया पटेल मोदी सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री आहेत. मागच्या काही काळापासून अनुप्रिया पटेल नाराज असल्यामुळे अपना दल भाजपासोबत युती तोडेल अशी चर्चा होती. जागा वाटपात प्राधान्य मिळावे अशी अपना दलची मागणी होती. उत्तर प्रदेशातील काही जागांवर अपना दलची बऱ्यापैकी ताकत आहे. सपा-बसपा आघाडीमुळे आधीच बॅकफुटवर असलेल्या भाजपाला अपना दलची नाराजी परवडणारी नव्हती.

First Published on March 15, 2019 4:41 pm

Web Title: loksabha election in uttarpradesh apna dal alliance with bjp