23 November 2020

News Flash

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना पितृशोक, वडील श्रीकृष्ण बिर्ला यांचं निधन

वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे वडील श्रीकृष्ण बिर्ला यांचं निधन झालं आहे. श्रीकृष्ण बिर्ला हे ९२ वर्षांचे होते. २९ सप्टेंबर रोजी कोटा या ठिकाणी त्याचं निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. श्रीकृष्ण बिर्ला यांच्या पार्थिवावर बुधवारी म्हणजेच ३० सप्टेंबरला सकाळी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. श्रीकृष्ण बिर्ला सरकारी कर्मचारी होते. ते सेल्स टॅक्स विभागातून सेवा निवृत्त झाले होते. एएनआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

ओम बिर्ला यांच्या वडिलांचे निधन झाल्याची माहिती समजताच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी श्रीकृष्ण बिर्ला यांना आदरांजली वाहिली आहे.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या वडिलांचे निधन झाल्याचे वृत्त ऐकून अतीव दुःख झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, मी बिर्ला कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे या आशयाचं ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2020 11:26 pm

Web Title: loksabha speaker om birla father shreekrishna birla passes away scj 81
Next Stories
1 उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना करोनाची बाधा
2 सिरम इन्स्टिट्युट लशीचे १० कोटी अतिरिक्त डोस तयार करणार
3 ‘एकतर्फी ठरवलेली १९५९ सालची LAC अजिबात मान्य नाही’, भारताने चीनला स्पष्टपणे सांगितलं
Just Now!
X