18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास १० वर्षे कारावास

ज्या १० वर्षांच्या मुलीवर आपण बलात्कार केल्याचा आरोप आहे

पीटीआय, नवी दिल्ली | Updated: March 21, 2017 1:29 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

आपल्या अपत्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा खोटा आरोप लावण्याइतपत कोणतेही पालक स्वत:चे अध:पतन करणार नाहीत, असे मत व्यक्त करून दिल्ली उच्च न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली २६ वर्षांच्या एका तरुणाला दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

ज्या १० वर्षांच्या मुलीवर आपण बलात्कार केल्याचा आरोप आहे, तिच्या आईने आपल्याकडून काही पैसे उधार घेतले होते आणि जेव्हा आपण ते परत करण्यास सांगितले तेव्हा तिने आपल्याला या प्रकरणात गोवले, हा आरोपीचा बचाव अमान्य करून अतिरिक्त सत्र न्यायाधीश संजय शर्मा यांनी त्याची याचिका फेटाळून लावली.

आपण पैसे दिल्याचा कुठलाही पुरावा बचाव पक्षाने सादर केला नाही, तसेच रक्कम किंवा ती दिल्याची तारीखही त्याने उघड केलेली नाही. त्यामुळे हा बचाव विश्वासार्ह नाही. याशिवाय, अशा गंभीर आरोपाद्वारे आपल्याच अपत्याला बदनामी व अप्रतिष्ठा यांना सामोरे जावे लागण्याइतपत कुठल्याही तरुण मुलीचे पालक अध:पतित होणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

उत्तर प्रदेशातील बुलंदशहरचा रहिवासी असलेला आरोपी सोनू याने जून २०१४ मध्ये त्याच्या शेजारच्या अल्पवयीन मुलीला आपल्या खोलीवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता हे सिद्ध झाले असल्याचे नमूद करतानाच; त्याने या मुलीबाबत पूर्वीही असे कृत्य केले होते, याचा न्यायालयाने उल्लेख केला.

अभियोजन पक्षाच्या म्हणण्यानुसार, ही मुलगी तिच्या कुटुंबीयांसोबत घरी झोपली असताना आरोपीने तिला उठवून आपल्या खोलीवर येण्यास सांगितले. तिने नकार दिला असता त्याने मुलीचे तोंड दाबून तिला खोलीवर नेले व तिच्यावर बलात्कार केला.

First Published on March 21, 2017 1:18 am

Web Title: loksatta crime news 15