News Flash

लोकसत्ता डॉट कॉम ठरली मराठीमधील नंबर वन न्यूज वेबसाईट

डिसेंबरमध्ये लोकसत्ता वेबसाईटला १.३४ कोटी वाचकांनी भेट दिली

लोकसत्ता डॉट कॉम ठरली मराठीमधील नंबर वन न्यूज वेबसाईट

इंडियन एक्स्प्रेस समूहातील लोकसत्ता डिजिटलनं मराठी वृत्त माध्यमांमध्ये वादातीतरीत्या अग्रस्थान प्राप्त केलं आहे. डिसेंबरमध्ये लोकसत्ता वेबसाईटला १.३४ कोटी वाचकांनी भेट दिली.

ताज्या ‘कॉमस्कोअर एमएमएक्स’ अहवालानुसार, लोकसत्ता डॉट कॉमनं डिसेंबर २०२० ला संपलेल्या तिमाहीत १२ टक्क्यांची वाढ प्राप्त केली आहे. इंडियन एक्स्प्रेस समूहाचा आघाडीचा मराठी न्यूज ब्रँड असलेल्या लोकसत्ता डॉट कॉमनं पाच प्रादेशिक वेबसाईट्सना वाचकसंख्या वाढीमध्ये मागे टाकलं आहे. यामध्ये प्रामुख्याने न्यूज १८ लोकमत ( उणे ८ टक्के), ईसकाळ डॉट कॉम (उणे ९ टक्के), लोकमत डॉट कॉम (उणे १५ टक्के) व महाराष्ट्र टाइम्स (उणे ६० टक्के) या वेबसाईट्सचा समावेश आहे.

इंडियन एक्सप्रेस ऑनलाइन मीडिया सर्विसेसचे (IE Online Media Services) सीईओ संजय सिंधवानी यांनी लोकसत्ता डॉट कॉमने मिळवलेल्या या यशाबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. लोकसत्ता डॉट कॉम आघाडीवर राहण्यामध्ये नवीन वाचकसंख्येत झालेली ऑरगॅनिक वाढ, जुन्या वाचकांचा सातत्यपूर्ण प्रतिसाद हे महत्त्वाचे घटक असल्याचं सिंधवानी म्हणाले आहेत. “स्पर्धकांच्या तुलनेत आम्हाला मिळालेली आघाडी, आमच्या कंटेंटवर वाचकांचा विश्वास असल्याचं द्योतक आहे. लोकसत्ताच्या वेबसाइटवर जगभरातल्या मराठी वाचकांना उपयुक्त व अचूक कंटेट योग्य वेळी देणाऱ्या संपादकीय विभागाचं मी अभिनंदन करतो. वाचकांना सर्वसमावेशक कंटेंट मिळावा व त्यांना डिजिटल प्लॅटफॉर्मचा आनंददायी अनुभव यावा यासाठी संपादकीय विभागाबरोबर आमची संपूर्ण टीम सतत कार्यशील राहील,” असा विश्वास सिंधवानी यांनी व्यक्त केला.

इंडियन एक्स्प्रेस समूह भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल न्यूज पब्लिशर्सपैकी एक आहे. इंडियन एक्स्प्रेस डॉट कॉम ही समूहाची फ्लॅगशिप वेबसाइट देशातील सर्वात मोठ्या इंग्रजी न्यूजपेपर साईट्सपैकी एक आहे.

दी इंडियन एक्स्प्रेस व अर्थविषयक वृत्तपत्र दी फायनान्शियल एक्स्प्रेस दररोज भारतातल्या डझनभर शहरांमधून प्रकाशित होतात, यामध्ये प्रामुख्यानं नवी दिल्ली, मुंबई, बंगळुरू, कोलकाता, पुणे, चंदीगड, लखनौ, जम्मू व चेन्नई यांचा समावेश आहे. इंडियन एक्स्प्रेस समूह मराठीतलं सर्वात मोठं वृत्तपत्र लोकसत्ता मुंबईत प्रकाशित करतं व जनसत्ता हिंदीमध्ये प्रकाशित करतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 11, 2021 3:56 pm

Web Title: loksatta digital becomes no 1 marathi news website
Next Stories
1 १३० पेक्षा अधिक भाजपा कार्यकर्त्यांची ‘टीएमसी’च्या गुंडांकडून हत्या – अमित शाह
2 शरद पवारांनी यु-टर्न घेतल्याच्या मोदींच्या टीकेला सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर; म्हणाल्या…
3 …तर आम्ही कठोर कारवाई करु; मोदी सरकारने सोशल मीडिया कंपन्यांना दिला इशारा
Just Now!
X