News Flash

FB बुलेटीन : राहुल गांधींना संघाचं निमंत्रण, गोध्राप्रकरणी दोघांना जन्मठेप आणि अन्य बातम्या

दिवसभरातील बातम्यांचा धावता आढावा

दिवसभरातील पहिली महत्वाची बातमी सनातन संस्थेविषयी आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून ते सनातनचे साधक असल्याचे म्हटले जात आहे. मात्र वैभव राऊत आणि अटकेत असलेले इतर जण आमचे साधक नाहीत असा दावा सनातनने केला आहे. आज त्यांनी मुंबईमध्ये एक पत्रकार परिषद घेऊन याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. दुसरी बातमीही देशाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असून गोध्रा हत्याकांडप्रकरणी दोघांना जन्मठेपीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर तिघांची या प्रकरणातून सुटका करण्यात आली आहे.

याशिवाय राहुल गांधींना संघाने आपल्या एका कार्यक्रमाचे आमंत्रण दिले आहे. हा कार्यक्रम सप्टेंबरमध्ये होणार असून राहुल गांधी त्याला उपस्थित राहणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याबरोबरच एशियन गेम्समधील भारताची कामगिरी तसेच मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आजच्या लोकसत्ताच्या टी टाईम बुलेटीनमध्ये घेण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2018 5:25 pm

Web Title: loksatta facebook bulletin 27th august 2018
Next Stories
1 …म्हणून शशी थरुर यांनी सुरु केला #ProudToBeMalayali चा ट्रेंड
2 त्रिपुरात सरकारी कर्मचाऱ्यांना जीन्स आणि गॉगल वापरण्यास बंदी
3 भारतीय लष्करासाठी टाटा मोटर्सनं खास डिझाईन केलेली ‘सफारी स्टॉर्म’
Just Now!
X