दिवसभरातील पहिली बातमी आहे सुप्रीम कोर्टासंदर्भातील. भारतात बघावं तिथे बलात्कार होत आहेत अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने उद्विग्नता व्यक्त केली आहे. दुसरी महत्वाची बातमी आहे काश्मीरमधून. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेला घुसखोरीचा प्रयत्न फसला असून सुरक्षा यंत्रणेचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये दोन दहशतवादी ठार झाले आहेत तर चार जवान शहीद झालेत. या बातम्यांबरोबरच देश, विदेश, मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला हा धावता आढावा लोकसत्ता ऑनलाइनच्या टी टाइम बुलेटनमध्ये…

अन्य महत्वाच्या बातम्यांसाठी लॉग ऑन करा loksatta.com वर