X

FB बुलेटीन: राम कदम पुन्हा चुकले, चंद्रकांत पाटील यांचा यू- टर्न व अन्य बातम्या

दिवसभरातील महत्वाच्या बातम्यांचा धावता आढावा

दिवसभरातील पहिली महत्वाची बातमी आहे मुंबईमधून. मुंबईमधील घाटकोपरचे आमदार राम कदम यांनी पुन्हा एक गंभीर चूक केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊण्टवरून राम कदम यांनी परदेशात कॅन्सरवर उपचार घेत असलेली अभिनेत्री सोनाली बेंद्रेला श्रद्धांजली वाहिली आहे. दुसरी महत्वाची बातमी आहे राज्याच्या राजकारणामधील चंद्रकांत पाटील यांनी आपण यापुढे निवडणुक लढणार नाही या वक्तव्यावरून यु-टर्न घेतला आहे. या बातम्यांबरोबरच देश, विदेश, मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला हा धावता आढावा लोकसत्ता ऑनलाइनच्या टी टाइम बुलेटनमध्ये…अन्य महत्वाच्या बातम्यांसाठी लॉग ऑन करा loksatta.com वर