News Flash

मोदी सूडाचं राजकारण करतात हा पवारांचा आरोप पटतो का?, जनमताचा कौल म्हणतो…

३६ हजारहून अधिक वाचकांनी नोंदवलं आपलं मत

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सूडाचं राजकारण करतात, त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर केला जात आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केलं. शरद पवार यांनी मांडलेलं हे मत किती योग्य आहे यासंदर्भात ‘लोकसत्ता डॉट कॉम’ने जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ‘लोकसत्ता डॉट कॉम’ने #LoksattaPoll या हॅशटॅगअंतर्गत घेतलेल्या पोलमध्ये फेसबुक आणि ट्विटवरुन अगदीच विरोधी मतप्रवाह दिसून आले आहेत. फेसबुकवरील जनमत कौल हा मोदी सूडाचं राजकारण करतात या मताच्या बाजूने असून ट्विटवरील वाचकांनी मात्र मोदी सूडाचं राजकारण करत नाहीत असं मत नोंदवलं आहे. फेसबुक आणि ट्विटवर एकूण ३६ हजारहून अधिक वाचकांनी या प्रश्नावर आपलं मत नोंदवलं आहे.

पवार काय म्हणाले होते?

शिवसेनेचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची खास मुलाखत घेतली. ही मुलाखत शनिवार, रविवार आणि सोमवारी तीन टप्प्यांमध्ये प्रदर्शित करण्यात आली. या मुलाखतीमधील शेवटच्या भागात पवारांना राऊत यांनी “ममता बॅनर्जींपासून ते ज्या राज्यात भाजपाची सत्ता नाही त्या राज्यांचे प्रमुख नेते कायमच नरेंद्र मोदी सूडाचं राजकारण करत असल्याचा आरोप करतात. फोडाफोडीचं राजकारणही केलं जातं यासंदर्भात तुमचं काय मत आहे?”, असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना पवारांनी, “पंतप्रधान नरेंद्र मोदी सूडाचं राजकारण करत आहेत. सत्तेचा गैरवापर करत आहेत हे सरळसरळ दिसतंय,” असं उत्तर देतानाच मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते तेव्हा मोदी त्यांच्याबद्दल कसं बोलायचे यासंदर्भातील दाखला दिला.

जनमताचा कौल

पवरांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून केल्या जाणारा सूडाच्या राजकारणाचा आरोप योग्य असल्याच्या बाजूने मत मांडल्याचे मुलाखतीमध्ये दिसले. यावरुनच ‘लोकसत्ता डॉट कॉम’ने फेसबुक आणि ट्विटवर, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी सुडाचं राजकारण करतात, हा शरद पवारांचा आरोप योग्य वाटतो का?’ असा प्रश्न वाचाकांना विचारला. या प्रश्नाला ‘होय’ आणि ‘नाही’ असे दोन पर्याय देण्यात आले होते. फेसबुकवर या जनमत चाचणीमध्ये २३ हजार ५०० हून अधिक वाचकांनी आपलं मत नोंदवलं. तर ट्विटवरही या पोलवर १२ हजार ६७५ जणांनी आपलं मत मांडलं.

नक्की वाचा >> “मी मोदींच्या चेंबरमध्ये गेलो आणि त्यांना सांगून आलो की…”; राज्यातील सत्ता संघर्षासंदर्भात पवारांचा खुलासा

फेसबुकवरील वाचक म्हणतात, “पवारांच्या मताशी सहमत”

फेसबुकवरील २३ हजार ५०० मतांपैकी ६२ टक्के मते ही ‘होय’च्या बाजूने आहेत तर ३८ टक्के मते ही ‘नाही’च्या बाजूने आहेत. म्हणजेच फेसबुकवरील जनमत चाचणीमध्ये सहभागी झालेल्या २३ हजार ५०० पैकी १४ हजारहून अधिक वाचकांनी ‘होय मोदी सूडाचं राजकारण करतात,’ असं मत नोंदवलं तर ८ हजार ८०० हून अधिक वाचकांनी ‘नाही, मोदी सूडाचं राजकारण करत नाहीत,’ असं म्हटलं आहे.

ट्विटरवरील कौल मोदींच्या बाजूने

फेसबुकवरील वाचकांनी पवारांची बाजू घेतली असली तरी ट्विटरवरील वाचकांनी मात्र मोदींच्या बाजूने कौल दिल्याचे पहायला मिळत आहे. ट्विटवरील १२ हजार ६७५ पैकी ६७.१ टक्के वाचकांनी ‘मोदी सूडाचं राजकारण करत नाहीत,’ असं मत नोंदवलं आहे. तर ‘मोदी सूडाचं राजकारण करतात’ असं मत नोंदवणाऱ्यांची संख्या  ३२.९ टक्के इतकी आहे.

नक्की वाचा >> “सर्व विरोधकांनी एकत्र येऊन देशातील जनतेला राजकीय पर्याय उपलब्ध करुन देणं ही राष्ट्रीय गरज”

ट्विटरवर मत नोंदवणाऱ्या १२ हजार ६७५ वाचकांपैकी ८ हजार ५०५ जणांनी मोदी सूडाचं राजकारण करत नाहीत असं म्हटलं आहे तर ४ हजार १७० जणांनी पवारांचे मत योग्य असल्याचे सांगत ‘मोदी सूडाचं राजकारण करतात’ या मताशी सहमती दर्शवली आहे.

एकंरितच या जनमत चाचणीच्या आकडेवारीवरुन वाचकांमध्येच टोकाचे दूमत असल्याचे चित्र दिसून येत आहे असंच म्हणता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 3:35 pm

Web Title: loksatta poll pm modi does politics of revenge or not opinion poll says readers are divided on topic scsg 91
Next Stories
1 चीनशी जवळीक ठरते आहे नेपाळच्या पंतप्रधानांच्या फायद्याची
2 “सचिन पायलट यांनी भाजपासोबत मिळून रचलं होतं सरकार पाडण्याचं षडयंत्र”, गंभीर आरोप
3 International Space Station: आज भारतातल्या काही शहरांमध्ये घडणार दर्शन
Just Now!
X