लंडनच्या चारींग क्रॉस रेल्वे स्टेशनवर शुक्रवारी सकाळी एका व्यक्तीने शरीरावर बॉम्ब बांधला असल्याचा दावा करुन एकच खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे लगेचच चारींग क्रॉस रेल्वे स्टेशन रिकामी करण्यात आले. दरम्यान ब्रिटीश पोलिसांनी आता बॉम्ब असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. आम्ही लवकरात लवकर स्टेशन पुन्हा सुरु करण्यावर काम करत आहोत असे ब्रिटनच्या वाहतूक पोलिसांनी सांगितले.

शुक्रवारी सकाळी आरोपी रेल्वे रुळावर उतरला व त्याने शरीरावर बॉम्ब बांधला असल्याचा दावा केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. चारींग क्रॉस रेल्वे स्टेशन तात्काळ रिकामी करण्यात आले.

ही घटना घडल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. त्यामध्ये स्टेशन परिसरात मोठया प्रमाणावर बंदोबस्त दिसत होता. मागच्या काही काळात ब्रिटनमध्ये अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत.