पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटी रुपयांचा चुना लावून लंडनमध्ये पळून गेलेला मुख्य आरोपी नीरव मोदीविरोधात कारवाईचा फास आवळला गेला आहे. भारतात घोटाळा करुन फरार झालेल्या या उद्योगपतीविरोधात लंडनमधील वेस्टमिनिस्टर न्यायालयाने वॉरंट जारी केले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नीरवला कोणत्याही क्षणी अटक केली जाऊ शकते.

सीबीआयने इंटरपोल आणि यूके आथॉरिटिजशी संपर्क करून फरार नीरव मोदीविरोधात रेड कॉर्नर नोटीसवर कारवाई करत अटक करण्याची मागणी केली होती. तपास यंत्रणेने दीर्घ कालावधीपासून नीरव मोदीविरोधात ब्रिटनकडे प्रत्यार्पणाची अधिकृत मागणी जुलै-ऑगस्टमध्ये केली होती.

नीरव मोदी सध्या लंडनमध्ये एैषोरामी जीवन जगत आहे. तो लंडनमधील वेस्ट एंड परिसरातील एका अर्पाटमेंटमध्ये राहत असल्याचे सांगण्यात येते. या अर्पाटमेंटची किंमत ७३ कोटी रूपये आहे. नुकताच त्याला माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी टिपले होते.