News Flash

संशयास्पद वाहन सापडल्याने लंडनमधील रेल्वे स्थानकावर खळबळ

सतकर्तेच्या आदेशानंतर हे रेल्वे स्थानक सध्या बंद करण्यात आल्याची माहिती लंडन पोलिसांनी दिली.

London Golders Green station : सध्या पोलिस या गाडीची तपासणी करत आहेत.

बेवारस वाहन सापडल्यामुळे लंडनमधील गोल्डर्स ग्रीन हे भुयारी रेल्वे स्थानकाचा परिसर काही वेळापूर्वीच खाली करण्यात आला आहे. या भागात ज्यू समाजातील लोक मोठ्याप्रमाणावर वास्तव्याला आहेत. सतकर्तेच्या आदेशानंतर हे रेल्वे स्थानक सध्या बंद करण्यात आल्याची माहिती लंडन पोलिसांनी दिली. रेल्वे स्थानकाच्यानजीक स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी सात वाजता एक बेवारस गाडी संशयास्पद स्थितीत मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने या वाहनाच्या मालकाचा शोध घेण्यास सुरूवात केली असून घातपाताची शक्यता लक्षात घेऊन सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या पोलिस या गाडीची तपासणी करत आहेत.
फ्लोरिडमधील नाईटक्लबमध्ये गोळीबार, २ जणांचा मृ्त्यू १४ हून अधिक जखमी
जर्मनीत स्फोट, सिरियन नागरिकाने केला आत्मघातकी हल्ला

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2016 2:55 pm

Web Title: london golders green station closed due to security alert over abandoned car
Next Stories
1 फ्लोरिडात नाईटक्लबमध्ये गोळीबार, २ जणांचा मृत्यू
2 सर्वोच्च न्यायालयाकडून विजय मल्यांना अवमान खटल्याची नोटीस
3 प्रसिद्ध सर्च इंजिन असलेल्या YAHOO ची होणार विक्री!
Just Now!
X