18 February 2018

News Flash

विजय मल्ल्याचा शाही थाट! आठवड्याचा खर्च १६ लाख रुपये

लंडनमधील हायकोर्टाने आठवड्याचा खर्च वाढवून दिला

लंडन | Updated: February 14, 2018 9:14 AM

विजय मल्ल्या. (संग्रहित छायाचित्र)

ब्रिटनमधील न्यायालयाने ९० दशलक्ष डॉलरचा दंड ठोठावला असला तरी मद्यसम्राट विजय मल्ल्याचा शाही थाट काही कमी झालेला नाही. मल्ल्याचा आठवड्याचा खर्च तब्बल १८, ३२५ युरो म्हणजेच १६ लाख रुपये इतका आहे.

भारतातील बँकांचे ९ हजार कोटी रुपये बुडवून परदेशात पळालेल्या विजय मल्ल्याला लंडनमधील हायकोर्टाने आठवड्याचा खर्च वाढवून दिला आहे. यापूर्वी मल्ल्याच्या आठवड्यातील खर्चावर ५ हजार युरोची (४.५ लाख) मर्यादा होती. ती आता वाढवून १८, ३२५ युरो (१६ लाख रुपये) इतकी करण्यात आली आहे. ब्रिटनमधील शाळेतून बाहेर पडलेल्या तरुणाला मिळणाऱ्या पगारा इतका विजय मल्ल्याचा आठवड्याचा खर्च असल्याचे सांगितले जाते.

‘विजय मल्ल्या यांचे राहणीमान उच्च होते. आता एखादा खटला सुरु असल्याने विजय मल्ल्याच्या राहणीमानात फरक पडू शकत नाही. त्यामुळे हायकोर्टानेही खर्चाची मर्यादा वाढवून दिली’, असे मल्ल्याच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, सोमवारी ब्रिटनमधील न्यायालयाने विजय मल्ल्याला ९० दशलक्ष डॉलरची भरपाई देण्याचे आदेश दिले. २०१४ मध्ये किंगफिशर एअरलाइन्सने सिंगापूरच्या बीओसी एव्हिएशन या कंपनीकडून चार प्रवासी विमान भाड्याने घेण्याचा करार केला होता. त्यापैकी ३ विमाने किंगफिशर एअरलाइन्सला मिळाली. तर किंगफिशरने या करारात ठरलेली रक्कम न दिल्याने चौथे विमान देण्यात आले होते. या थकबाकीच्या वसूलीसाठी बीओसी एव्हिएशनने किंगफिशरवर खटला भरला होता.

First Published on February 14, 2018 9:14 am

Web Title: london high court increased weekly living allowance of vijay mallya euro
  1. Udaypadhye Shankar
    Feb 14, 2018 at 11:02 am
    बँकेने आम्हालाही हजारो कोटी रु. कर्ज द्यावे, मग आम्हीही आठवड्याला १६ लाख काय २० लाख सुद्धा खर्च करू.
    Reply