News Flash

भगवान राम हे समाजवादी पक्षाचे, आम्हीसुद्धा राम भक्त – अखिलेश यादव

लवकरच संपूर्ण कुटुंबासह अयोध्येत पूजा करण्यासाठी जाणार

उत्तर प्रदेशात 2022 विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. त्यानिमित्ताने उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव सध्या राज्याच्या विविध भागातील दौऱ्यावर आहेत. आजमगड येथून लखनऊला परतत असताना अखिलेश यादव हे अयोध्या येथे थांबले होते. यावेळी अखिलेश यादव यांनी भगवान राम हे आपल्या पक्षाचेही आहेत असं म्हटलं आहे. “भगवान राम हे समाजवादी पक्षाचेदेखील आहेत आणि आपण लवकरच संपूर्ण कुटुंबासह अयोध्येत पूजा करण्यासाठी जाणार,” असल्याचे अखिलेश यादव म्हटले आहे.

“राम आणि कृष्ण यांच्यावर कोणाचा हक्क नाही. भगवान राम हे समाजवादी पक्षाचेही आहेत. आम्ही रामभक्त आणि कृष्णभक्त आहोत, आपण रामाची पूजा करण्यासाठी आपल्या कुटुंबातील सदस्यांसह लवकरच अयोध्येला जाणार आहे,” असे यादव यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मात्र हा दौरा कधी असेल हे अखिलेश यादव यांनी स्पष्ट केलं नाही.

आणखी वाचा- मोदी सरकारसाठी आंदोलनकर्ते शेतकरी खलिस्तानी, तर भांडवलदार हे उत्तम मित्र – राहुल गांधी

पत्रकारांशी बोलताना अखिलेश यादव यांनी अयोध्येच्या विकासासाठी त्यांच्या सरकारच्या कार्यकाळात केलेल्या विविध कामांची यादीही वाचून दाखवली. “अयोध्येतील विविध घाट तसेच भजनस्थळं यांचा विकास समाजवादी पक्षाच्या सरकारच्या काळात करण्यात आला,” असल्याचे ते म्हणाले. “अध्योतील जन्मभूमी स्थळ परिक्रमेच्या संपूर्ण मार्गांवर प्राचीन महत्त्व असलेली पारिजातक, पपई आणि वड यासारख्या झाडांची लागवड करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

आणखी वाचा- फेसबुकने बजरंग दलाला ‘धोकादायक संघटना’ मानण्यास दिला नकार, जाणून घ्या काय आहे प्रकरण

दरम्यान, कृषी कायद्यांवर बोलताना त्यांनी भाजपावर हल्ला चढवला. “जर भाजपाला खरोखरच शेतकऱ्यांची काळजी असती तर शेतकऱ्यांना फायदा होईल असे कायदे आणि नियम आणले असते. भाजपाने कॉर्पोरेट घराण्यांच्या फायद्यासाठी हे काळे कायदे आणले आहेत आणि शेतकऱ्यांच्या मृत्यूपत्रावर सही केली आहे,” अशी टीका त्यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2020 12:16 pm

Web Title: lord ram belongs to the samajwadi party we are also ram devotees akhilesh yadav abn 97
Next Stories
1 करोना व्हायरसमुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द
2 सामान्यांच्या खांद्यावरील खर्चाचा भार वाढला; गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागला, जाणून घ्या नवे दर
3 मोदी सरकारसाठी आंदोलनकर्ते शेतकरी खलिस्तानी, तर भांडवलदार हे उत्तम मित्र – राहुल गांधी
Just Now!
X