News Flash

अयोध्या ते अमेरिका… टाइम्स स्वेअरवरील १७ हजार फुटांच्या स्क्रीनवर झळकणार प्रभू रामाची 3D प्रतिमा

टाइम्स स्वेअरवर १४ तास झळकणार 'जय श्रीराम' असा मजकूर

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामधील हिंदू धर्मीय समाजाचे प्रमुख आणि अमेरिकन इंडियन पब्लिक अफेर कमिटीचे अध्यक्ष जगदीश शेहानी यांनी रामजन्मभूमी भूमिपूजन सोहळ्याचा उत्सव साजरा केला जाणार असल्याची माहिती दिली आहे. पीटीआयशी बोलताना जगदीश यांनी जगप्रसिद्ध टाइम्स स्वेअर येथे प्रभू रामांचे मोठे चित्र झळकवले जाणार असल्याची माहिती दिली आहे. ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा अयोध्येमध्ये मंदिराच्या कामाचे भूमिपूजन करतील त्याच दिवशी टाइम्स स्वेअरवरील बिलबोर्डवर प्रभू रामांची थ्री डी प्रतिमा झळकवून सोहळ्याचा आनंद साजरा केला जाणार असल्याचे जगदीश म्हणाले. हा एक ऐतिहासिक दिवस असल्याने आम्ही तो अमेरिकेमध्येही साजरा करणार असल्याचे जगदीश यांनी स्पष्ट केलं आहे.

नक्की पाहा खास फोटो >> अयोध्या सजली… शहरातील घरं, रस्ते, दुकानं सारं काही ग्राफिटी पेंटिगने नटली

टाइम्स स्वेअरवरील नॅसडॅकची स्क्रीन ही काही विशेष दिवसांच्या निमित्ताने रोषणाई करुन सजवली जाते. त्यासाठी ही स्क्रीन भाड्याने दिली जाते. १७ हजार फूट आणि वर्तुळाकार अशा या एलईडी स्क्रीनवर  प्रभू रामांची प्रतिकृती झळकवली जाणार आहे. ही टाइम्स स्वेअरवरील सर्वात स्पष्ट आणि सर्वाधिक रेझोल्यूनश असणारी एलईडी स्क्रीन आहे. तसेच जगभरातील विशेष दिवसांचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या टाइम्स स्वेअरवर ही असल्याने तिला अधिक महत्व आहे.

नक्की वाचा >> अयोध्या : भूमिपूजन सोहळ्याआधीच करोनाचे विघ्न; मुख्य पुजाऱ्यासहीत १६ पोलिसांना करोनाची लागण

पाच ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजल्यापासून रात्री १० वाजल्यापर्यंत या स्क्रीनवर भूमिपूजन सोहळ्याचा आनंद साजरा करण्यासाठी विशेष फोटो आणि व्हिडिओ दाखवले जाणार आहेत. यामध्ये ‘जय श्रीराम’ असा हिंदी आणि इंग्रजीमधील मजकूर, प्रभू रामाची चित्रं, व्हिडिओ आणि थ्री डी चित्रंही दाखवली जाणार आहेत. तसेच मंदिराची रचना कशी असेल याचबरोबर त्या दिवशी पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणाऱ्या भूमिपूजन सोहळ्याचे फोटोही या स्क्रीनवर दाखवण्यात येणार आहेत. त्यामुळेच अयोध्येबरोबरच जगातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ असणाऱ्या टाइम्स स्कवेअरवरही जय श्रीरामच्या घोषणा आणि फोटो पहायाला मिळणार आहेत.

जगदीश यांनी दिलेल्या माहितीनुसार ५ ऑगस्ट रोजी टाइम्स स्वेअरवर हिंदू समाजातील लोकं आनंदोत्सव साजरा करणार आहेत. मिठाई वाटली जाणार आहे. असा दिवस आय़ुष्यातून एकदाच आणि शतकामध्ये खूपच कमी वेळा पहायला मिळतो. त्यामुळे आम्ही जोरदार पद्धतीने हा साजरा करणार आहोत. त्यासाठी टाइम्स स्वेअरसारख्या जागेपेक्षा अधिक चांगले ठिकाण कोणते असू शकते, असंही जगदीश यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> टपाल तिकीटावर दिसणार राम मंदिर, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार प्रकाशित

अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्याचे जगभरातील हिंदूंचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली प्रत्यक्षात साकारले जाणार आहे. हा दिवस आम्हाला एवढ्या लवकर पहायला मिळेल असा विचारही आम्ही सहा वर्षांपूर्वी केला नव्हता. मात्र मोदींच्या नेतृत्वाखाली हे शक्य झालं आहे, अशा शब्दांमध्ये जगदीश यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. टाइम्स स्वेअरवर हा सोहळा साजरा करण्यासाठी हिंदू समाजातील अनेकांनी पुढाकार घेत आर्थिक आणि इतर मदत केल्याने आम्हाला या आनंदामध्ये अमेरिकेतून सहभागी होता येणार असल्याचेही जगदीश म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 3:33 pm

Web Title: lord ram images to be displayed in times square to celebrate august 5 ayodhya temple groundbreaking ceremony scsg 91
Next Stories
1 करोना लसी संदर्भातील ‘त्या’ महत्त्वाच्या बैठकीत रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन एकच गोष्ट म्हणाले…
2 “राम मंदिरासोबतच सरकारकडून ‘ज्ञान मंदिरा’च्या उभारणीची पायाभरणी”
3 “पोलिसांना त्यांचं काम करु द्या”, सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली
Just Now!
X