देशात करोनाच्या नव्या रुग्णांमध्ये मंगळवारी गेल्या तीन महिन्यांतील सर्वात मोठी घसरण नोंदविण्यात आली.

दिवसभरात करोनाचे ३६,४७० रुग्ण आढळले तर ४८८ रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या तीन महिन्यांत पहिल्यांदाच करोनाची रुग्णवाढ ४० हजारांखाली नोंदविण्यात आली आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या ७९,४६,४२९ वर पोहोचली असून, मृतांचा आकडा १,१९,५०२ झाला आहे. देशभरात आतापर्यंत ७२,०१,०७० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. हे प्रमाण ९०.६२ टक्के आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या सलग पाचव्या दिवशी सात लाखांहून कमी म्हणजे ६,२५,८५७ आहे. हे प्रमाण ७.८८  टक्के आहे.