News Flash

धक्कादायक! शिक्षक डॉक्टर बनून करत होता करोनावर उपचार; रुग्णाच्या मृत्यूनंतर झाली अटक

शिक्षकाने एका रुग्णाच्या घरातच आयसीयूसारखी व्यवस्था केली होती

भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण झाला आहे. रुग्णालयांमध्ये डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे. रुग्णालयांकडून वारंवार यासंदर्भात प्रशासनाला सूचना देण्यात येत आहेत. तर दुसरीकडे काही लोक या परिस्थितीचा गैरफायदा देखील घेत असल्याचे दिसून आले आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये एक सरकारी शाळेतील शिक्षक चक्क डॉक्टर असल्याचे सांगत करोना रुग्णांवर उपाचर करत होता. अनेक दिवसांपासून तो रुग्णांवर उपचार करत होता. मात्र एका करोना रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याचं हे बिंग फुटलं आणि खरी माहिती समोर आली. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

लखनऊच्या चिनहट येथील आरोपी शशिवेंद्र पटेल हा सरकारी शाळेत जीवशास्त्राचा शिक्षक आहे. शशि स्वतःला कोर मेडिक्स इंडियाचा व्यवस्थापक आणि आरोग्य कर्मचारी असल्याचे सांगतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शशिने रुग्णांना फसवून लुटले असल्याची त्याच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

चिनहट पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेने शशिविरुद्ध तक्रार नोंदवली होती. करोना झालेल्या नवऱ्याच्या उपचारासाठी त्याने आपल्याकडून मोठी रक्कम घेतल्याचे त्या महिलेने सांगितले. शशिच्या उपचारानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्यानंतर हे प्रकरण समोर आलं. पोलिसांनी अधिक तपास केला असता शशिवेंद्र स्वतःला आरोग्य कर्मचारी असल्याचे सांगत रुग्णांवर उपचार करत होता.

शशिने तक्रार नोंदवलेल्या महिलेच्या घरीच आयसीयूसारखी व्यवस्था केली होती. यासाठी त्याने पैसे देखील घेतले होते. त्यानंतर त्या महिलेच्या नवऱ्याचा मृत्यू झाला. यानंतर महिलेने उपचारांमध्ये झालेल्या चुकांमुळे पतीचा मृत्यू झाला असल्याची  पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2021 6:04 pm

Web Title: lucknow biology teacher poses as doctor to treat corona abn 97
Next Stories
1 “निवडणुकांमुळे कुटुंब उद्ध्वस्त झालं”, करोनामुळे पत्नीच्या मृत्यूनंतर पतीचा आक्रोश
2 “जर राज्यांना बोलण्यास परवानगी नव्हती तर बोलवलं कशाला?”
3 Mucormycosis : केंद्र सरकारनं म्युकरमायकोसिसचा केला साथरोग कायद्यात समावेश, नवी नियमावली लागू!
Just Now!
X