News Flash

…म्हणून उत्तर प्रदेशचा चित्ररथ राज्यभर फिरवणार : योगी आदित्यनाथ

जिथे जिथे हा चित्ररथ जाणार तिथे पुष्पवृष्टीने होणार स्वागत

(फोटो सौजन्य ट्विटर आणि पीटीआयवरुन साभार)

प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील राजपथावरील संचलनामध्ये सहभागी झालेल्या उत्तर प्रदेश राज्याच्या श्रीराम मंदिराच्या चित्ररथाला सर्वोत्तम चित्ररथ पुरस्कार मिळाला आहे. सर्व चित्ररथांपैकी उत्तर प्रदेशचा चित्ररथ सरस ठरला आहे. या निकालानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी आनंद व्यक्त केला आहे. ही बातमी उत्तर प्रदेशसाठी आनंदाची आणि अभिमानाची आहे असं योगी म्हणालेत. तसेच आता हा चित्ररथ उत्तर प्रदेशमधील जास्तीत जास्त लोकांना पाहता येण्यासंदर्भातील योजनाही असल्याचे योगींनी सांगितलं आहे. हा चित्ररथ राज्याच्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणार असल्याने आता तो राज्याभर फिरवला जाणार असून जिथे जिथे हा चित्ररथ जाईल तिथे त्याच्यावर पुष्पवृष्टी केली जाणार आहे. यंदा उत्तर प्रदेशच्या चित्ररथामध्ये अयोध्या येथे उभारण्यात येणाऱ्या भगवान श्रीरामांच्या मंदिराची प्रकिकृती साकारण्यात आली होती.

जगभरातील अनेकांनी लाइव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील राजपथावर पार पडलेल्या संचलनामधील चित्ररथ पाहिले. यंदा करोनामुळे केवळ २५ हजार जणांना प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली होती. अनेकांनी आपआपल्या राज्याच्या चित्ररथांचं उभं राहून स्वागत केलं. उत्तर प्रदेशचा चित्ररथ राजपथावर दाखल झाल्यानंतर जय श्रीरामच्या घोषणा देत चित्ररथाचे स्वागत करण्यात आलं.

राजपथावर विठू माऊली, ज्ञानेश्वरी अन् छत्रपती शिवाजी महाराज…; पाहा महाराष्ट्राच्या चित्ररथाचे खास फोटो

उत्तर प्रदेशचे अपर मुख्य सचिव नवीनत सहगल यांनी यंदा उत्तर प्रदेशच्या चित्ररखामधून राज्याच्या संस्कृतिक वारश्याची झलक दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे सांगितले. यामध्ये अयोध्येतील राम मंदिराच्या प्रतिमेबरोबरच रामायणामधील महत्वाच्या घटना आणि रामायणाची रचना करणारे वाल्मीकि ऋषीही या चित्ररथामध्ये दाखवण्यात आलेले. शबरीची उष्टी बोरं खाणारे प्रभू रामांचा प्रसंगही यामध्ये दाखवण्यात आलेला. सामाजिक एकतेचा संदेश देण्यासाठी रामायणातील काही प्रसंग या चित्ररथावर दाखवण्यात आले होते. या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला याबद्दल खूप आनंद होत असल्याचंही सहगल म्हणाले.

उत्तर प्रदेशच्या चित्ररथामध्ये भव्य राम मंदिराबरोबरच येथील संस्कृती, पंरपरा, कला आणि वेगवेगळ्या देशांचा प्रभू राम आणि अयोध्येशी असणारा संबंध दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. हुनमानाने आणलेली संजवनी, जटायू आणि भगवान श्री रामांमधील संवाद, अशोक वाटिका असे अनेक गोष्टींचं चित्र या चित्ररथामध्ये दाखवण्यात आलं होतं. विविड कंपनीने हा चित्ररथ तयार केला होता. मथुरामधील कलाकार या चित्ररथासोबत संचलनामध्ये सहभागी झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2021 1:29 pm

Web Title: lucknow cm yogi adityanath said like rajpath of delhi tableau of ram mandir will be travelling in whole up scsg 91
Next Stories
1 ‘मी राहुल गांधींशी लग्न करायला चाललेय’; सामान घेऊन विमानतळावर पोहचली महिला अन्…
2 अभिनेता शर्मन जोशीच्या वडिलांचे निधन
3 कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे; दिल्लीतील हिंसाचारावर राष्ट्रपतींनी व्यक्त केली नाराजी
Just Now!
X