13 December 2017

News Flash

उत्तर प्रदेशात न्यायालयाच्या परिसरात स्फोट; कोणतीही जीवितहानी नाही

स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट

लखनऊ | Updated: October 4, 2017 10:14 PM

Mumbai : यापूर्वी चेंबूरमध्ये जुलै महिन्यात कांचन नाथ या मॉर्निंग वॉकला गेल्या असताना त्यांच्या अंगावर नारळाचे झाड पडले होते. त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यावेळी पालिकेने जोरदार वाऱ्यांमुळे झाड पडल्याचे सांगत आपली जबाबदारी झटकली होती.

उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील जिल्हा न्यायालयात बुधवारी संध्याकाळी एका स्वच्छतागृहात स्फोट झाल्याने खळबळ उडाली. या स्फोटमुळे न्यायालय परिसरात चांगलाच गोंधळ उडाला. स्फोटाची माहिती कळताच पोलीस, श्वान पथक आणि बॉम्ब नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, अद्यापपर्यंत यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे कळते.

स्फोटाची ही घटना संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. न्यायालयाच्या पहिल्या मजल्यावरील स्वच्छतागृहात स्फोटाचा मोठा आवाज झाला. त्यानंतर तेथून धूरही निघत होता. न्यायालय परिसरातील लोकांना याची माहिती कळताच परिसरात गोंधळ आणि पळापळ सुरु झाली. त्यानंतर तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस श्वान पथकासह घटनास्थळी दाखल झाले. अद्याप या ठिकाणी शोध मोहीम सुरु आहे. तपास पथकाला घटनास्थळी काही बॉम्ब सदृश्य नमुनेही मिळाले आहेत. हा स्फोट कशामुळे झाला याची माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही.

First Published on October 4, 2017 10:13 pm

Web Title: lucknow district court bomb blast in bathroom