उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये हिंदू-मुस्लिम दांपत्याला पासपोर्ट जारी करण्यावरुन झालेला वाद नुकताच शमला, मात्र या प्रकरणाची चौकशी अद्याप बाकी आहे. सोशल मीडियावर वाद वाढल्यानंतर दांपत्याला तातडीने पासपोर्ट जारी करण्यात आला, पण त्यानंतर पासपोर्ट अधिकाऱ्याची बदली केल्याने वाद आणखी वाढायला सुरूवात झाली. प्रकरण समोर आल्यानंतर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना ट्विटरवर लक्ष्य करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुषमा स्वराज यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे, त्यांच्याविरोधात असभ्या भाषेचा वापर केला जात आहे. मात्र सुषमा स्वराज यांनी आपल्याविरोधात केल्या जाणऱ्या या सर्व ट्विटचं स्वतःच वेगळ्या पद्धतीने स्वागत केलं आहे. मी १७ ते २३ जून २०१८ दरम्यान भारतात नव्हते, माझ्या अनुपस्थीत येथे काय झालं हे मला माहित नाही. पण काही ट्विट्सद्वारे माझा खूप आदर ठेवला जात आहे. त्यामुळे मला हे ट्विट खूप आवडलेत आणि मी हे ट्विट तुमच्यासोबत शेअर करत आहे. असं ट्विट स्वराज यांनी रविवारी रात्री केलं.

स्वराज यांच्याविरोधात असंख्य ट्विट केले जात आहेत, त्यातील काही ट्विट्सवर नजर मारुया.

काय होतं प्रकरण –
लखनऊमध्ये पासपोर्ट कार्यालयात प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी गेले असताना मोहम्मद अनस सिद्दीकी आणि त्यांची पत्नी तन्वी सेठ यांच्यासोबत हा प्रकार घडला होता. पासपोर्ट कार्यालयातील अधिकारी विकास मिश्रा याने अनस सिद्दीकी यांना धर्मांतर करण्यास सांगितलं आणि पासपोर्ट देण्यास नकार दिला. इतकंच नाही तर तन्वी यांना सर्व कागदपत्रांवर आपलं नाव बदलण्यासही सांगितलं. जेव्हा त्यांनी नकार दिला तेव्हा त्याने त्यांच्यावर आरडाओरड सुरु केली. या वागणुकीमुळे धक्का बसलेल्या दांपत्याने सुषमा स्वराज यांच्याकडे तक्रार करत मध्यस्थी करण्याची मागणी केली होती. अनस आणि तन्वी यांचं २००७ मध्ये लग्न झालं आहे. त्यांनी सहा वर्षाची मुलगी आहे. दोघेही नोएडा येथे एका खासगी कंपनीत काम करतात.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lucknow passport issue sushma swaraj slams twitter trolls
First published on: 25-06-2018 at 09:02 IST