News Flash

क्रूरपणाचा कळस! Insuranceच्या पैश्यांसाठी नऊ वर्षांच्या चिमुकलीचा बळी

आई आणि सावत्र वडिलांनी मिळून लेकीला संपवलं, आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी निवडला पर्याय

प्रातिनिधिक छायाचित्र

मुलीच्या नावे असलेल्या इन्श्युरन्स पॉलिसीचे पैसे मिळवण्यासाठी आई आणि सावत्र वडिलांनी नऊ वर्षांच्या मुलीचा खून केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. लुधियानामध्ये हा प्रकार घडला आहे. या दाम्पत्याला आर्थिक अडचण सतावत होती. त्यामुळे ही कृती केल्याचं कळत आहे.

इंडिया टुडेने याविषयीचं वृत्त दिलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ वर्षीय पिंकी आणि तिचा नवरा नरिंद्रपाल या दोघांनीही भारती या पिंकीच्या नऊ वर्षीय मुलीचा १९ जून रोजी खून केला. या दोघांनीही भारतीच्या नावावर २०१८ मध्ये अडीच लाख रुपयांची इन्श्युरन्स पॉलिसी विकत घेतली होती. पोलिसांनी सांगितलं की या दोघांनी २०१९ मध्ये तीन लाख रुपयांची जमीन खरेदी केली होती आणि हे त्या जमिनीचे हप्ते भरत होते. त्यांनी १.४९ लाखांचं कर्ज फेडलं होतं. मात्र उरलेलं कर्ज फेडायला त्यांना त्रास होत होता. त्यामुळे त्यांनी भारतीचा खून करुन तिच्या इन्श्युरन्सच्या पैश्यातून आपलं कर्ज भरण्याचा प्लॅन केला होता.

हेही वाचा- पाच जणांची हत्या करून कुटुंबप्रमुखाची आत्महत्या

नरिंदरपाल हा आपली पत्नी आणि सावत्र मुलगी भारती ह्यांच्यासोबत राहत होता. तो पशुखाद्य बनवण्याच्या कारखान्यात काम करत होता आणि त्याच कारखान्याने दिलेल्या घरात राहत होता. भारती झोपेत असताना ह्या दोघांनी तिला या कारखान्यामध्ये नेलं आणि पिंकी म्हणजे भारतीच्या आईने ओढणीने तिचा गळा आवळला.

सकाळी हे दोघेही भारती बेशुद्ध असल्याचा बनाव करत रुग्णालयात पोहोचले. तेव्हा डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं की, नरिंदरपाल याला भारती आवडत नव्हती कारण ती त्याची सावत्र मुलगी होती. त्यामुळे तो तिला बऱ्याचदा मारहाणही करायचा.

आणखी वाचा- नराधम आलोक महिला वशीकरणाची विद्या शिकायचा

या दोघांनीही सुरुवातील भारती नैसर्गिकरित्या मरण पावल्याचा दावा केला. मात्र शवविच्छेदनाच्या अहवालातून हे समोर आलं की तिचा मृत्यू गळा आवळल्याने झाला आहे. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर हे दोघेही कबूल झाले आणि आर्थिक अडचण असल्याने मुलीला मारल्याचं सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2021 5:11 pm

Web Title: ludhiana shocker 9 year old girl murdered by mother step father for insurance payout vsk 98
Next Stories
1 “काँग्रेस आघाडीसाठी कुमकुवत, विधानसभा निवडणूक स्वबळावरच लढवणार”
2 “….तोपर्यंत आपला देश सुरक्षित नाही”, लसीकरणावरुन राहुल गांधींनी पुन्हा साधला निशाणा
3 डिझायनर मनीष मल्होत्रा, सब्यसाची, रितू कुमार ED च्या रडारवर; लवकरच चौकशी होण्याची शक्यता