News Flash

‘भाजपा- अण्णा द्रमुकची युती कोणत्या विचारधारेवर आधारित?’

मोदींनी द्रमुक-काँग्रेस आघाडीच्या वैचारिक अधिष्ठानाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला एम के स्टॅलिन यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी द्रमुकने काँग्रेसशी केलेल्या हातमिळवणीला 'संधीसाधू राजकारण' अशी उपमा देत टीका केली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी द्रमुकने काँग्रेसशी केलेल्या हातमिळवणीला ‘संधीसाधू राजकारण’ अशी उपमा देत टीका केली होती. दरम्यान, द्रमुकचे अध्यक्ष एम के स्टॅलिन यांनी पंतप्रधान मोदींना चोख शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. अण्णा द्रमुकबरोबर युती करण्याचा भाजपाचा प्रयत्न कोणत्या विचारधारेवर आधारित आहे, असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

द्रमुक आणि काँग्रेसची आघाडी ही संधीसाधू असल्याची टीका मोदींनी केली होती. त्यावर स्टॅलिन म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे अण्णा द्रमुकबरोबर युती करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. मग ही विचारधारेची युती आहे की लुटीची, हा माझा प्रश्न आहे. स्टॅलिन हे विधानसभेत विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी वारंवार मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्यासह अण्णा द्रमुकवर भ्रष्टचाराचे आरोप केला आहे.

मोदींनी आधी पलानीस्वामी आणि ओ पनीरसेल्वम यांच्या गटांचे विलिनीकरण करण्याचा प्रयत्न केला. ऑगस्ट २०१७ मध्ये त्यांच्या विलिनीकरणानंतर पनीरसेल्वम यांना उपमुख्यमंत्री केल्याचा आरोप केला.

रविवारी पक्षाच्या कार्यक्रमात मोदींनी काँग्रेस आणि त्यांचा सहकारी पक्ष द्रमुक यांच्यातील यापूर्वीच्या वादाचे किस्से जाणीवपूर्वक सांगितले होते. जैन आयोगाच्या अहवालावरुन दोन्ही पक्षात निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती दिली होती.

दरम्यान, स्टॅलिन यांच्या टीकेला अण्णा द्रमुकचे नेते डी. जयकुमार यांनी उत्तर दिले. २००९ मध्ये श्रीलंकेतील जातीय संघर्षादरम्यान तामिळींचे नुकसान रोखण्यास द्रमुक आणि काँग्रेस अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री आणि द्रमुकचे अध्यक्ष दिवंगत एम करुणानिधी यांचा यूपीएवर जबरदस्त प्रभाव होता. पण त्यांनी याप्रकरणात काहीच केले नाही, असेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2018 11:13 am

Web Title: m k stalin slams on pm modi for opportunistic alliance remark
Next Stories
1 नेहरुंचं ‘ते’ भाषण मला फार आवडतं; नितीन गडकरींकडून कौतुक
2 ‘ढोंगी धर्मनिरपेक्षतावाद्यांनी संस्कृत भाषेचा अपमान केला’
3 दोन जवानांच्या बलिदानाचा बदला घेणार! भारतीय लष्कराने पाकिस्तानला ठणकावले
Just Now!
X