फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूअल मॅक्रोन पत्रकारपरिषदेत अपघाताने ऑस्ट्रेलियन पंतप्रधान मालकोल्म टर्नबुल यांची पत्नी ल्युसीला डिलिशियस म्हणाले. मॅक्रोन यांच्या तोंडातून चुकून निघालेल्या या शब्दांचा सोशल मीडियाने चांगलाच समाचार घेतला. मॅक्रोन यांच्या या विधानावर सोशल मीडियावर लगेचच गंमीतीशीर प्रतिक्रिया उमटल्या.

फ्रेंच राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेले आहेत. पत्रकारपरिषद संपवताना आभार प्रदर्शन सुरु असताना हा गंमतीशीर प्रसंग घडला. डिलिशियस म्हणजे चवदार. एखादा पदार्थ आवडल्यानंतर कौतुकाने आपण डिलिशियस म्हणतो.

तुमच्या आदिरातिथ्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. तुम्ही माझे जे स्वागत केले त्याबद्दल मी तुमचे आणि तुमच्या डिलिशियस पत्नीचे आभार मानतो असे मॅक्रोन म्हणाले. मॅक्रोन यांच्या विधानानंतर सोशल मीडियावर लगेचच प्रतिक्रिया उमटल्या.