News Flash

भाजपाचा हा नेता पत्नीलाही ‘बहनजी’ म्हणत मत मागायचा, शत्रुघ्न सिन्हांनी सांगितला किस्सा

या दोघांनीही एकाच पक्षात अनेक वर्षे एकत्र काम केले आहे

शत्रुघ्न सिन्हांनी सांगितला किस्सा

आपल्या अभिनयाने हिंदी सिनेमामधील एक काळ गाजवणारे प्रसिद्ध अभिनेते आणि सध्या भारतीय जनता पक्षाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा हे रविवारी कपिल शर्मा शोमध्ये सहभागी झाले होते. कपिलबरोबर रंगलेल्या गप्पांमध्ये सिन्हा यांनी आपल्या खाजगी तसेच सार्वजनिक आयुष्यातील अनेक किस्से सांगतिले. यावेळेस नवज्योतसिंग सिद्धूही उपस्थित होते. या दोघांनीही एकाच पक्षात अनेक वर्षे एकत्र काम केले आहे. सिद्धू यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन काही महिने उलटले आहे. तर दुसरीकडे सिन्हा आपल्याच पक्षाच्या धोरणांवर तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेवर सार्वजनिकपणे टिका करतात दिसतात.

सिन्हा यांनी कपिलबरोबर गप्पा मारताना आपल्या लग्नाच्या वेळेचे किस्सेही सांगितले. प्रत्येक पुरुषाला आपल्या पत्नीला कशाप्रकारे संभाळून घ्यावे लागते याबद्दल सिन्हा यांनी मजेशीर वक्तव्य केली. सुत्रसंचालक असलेल्या कपिलचीच फिरकी घेताना सिन्हा यांनी, ‘अमिताभ बच्चन यांनी कपिल शर्माला सुखी संसारासाठी एक मंत्र दिल्याची फिरकी सिन्हा यांनी वरच घेतली हा मंत्र म्हणजे दिवसातून तीन वेळा आपल्या पत्नीला सॉरी म्हणायचे.’ असं सांगितलं. यानंतर प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला. पत्नी याच विषयावर पुढे बोलताना त्यांनी भाजपाचे दिवंगत नेता मदनलाल खुराना यांच्याबद्दलचा एक जुना किस्सा सांगितला. एकदा आम्ही बोलत असताना खुराना यांनी निवडणुकीच्या प्रसारादरम्यान खूप धावपळ आणि गोंधळ होतो असे मत व्यक्त केल्याची आठवण सिन्हा यांनी करुन दिली. ‘प्रचाराच्या काळात अनेकदा मी जेव्हा घरी जातो तेव्हा माझ्या बायकोला पाहूनही तिलाही हेच सांगायतो की बहन जी अपना व्होट और सपोर्ट मुझे ही देना!’ असं अनेकदा झाल्याचं खुराना यांनी मला सांगितल्याचे सिन्हा म्हणाले.

हा किस्सा ऐकून कपिलनेही सिद्धू यांची फिरकी घेतली. असाच एक किस्सा मला सिद्धू पाजींनी सांगितलेले असं कपिल म्हणाला. ‘निवडणुकांच्या सिद्धू हात जोडूनच झोपतात आणि सकाळी उठून थेट प्रचाराला निघून जातात असं सिद्धूंनी आपल्याला सांगितल्याचं कपिल म्हणाला.

पाहुणे म्हणून आलेल्या सिन्हा आणि त्यांची पत्नी पूनम यांनी त्यांची लव्ह स्टोरीच कार्यक्रमामध्ये सांगितले. अगदी पहिल्यांदा कधी कुठे भेट झाली पासून लग्नाच्या वेळी घडलेले अनेक मजेदार किस्से या दोघांनी प्रेक्षकांबरोबर शेअर केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2019 3:42 pm

Web Title: madan lal khurana used to ask vote from his wife too shatrughan sinha in kapil sharma show
Next Stories
1 ‘दंगल घडवून हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडणाऱ्या नेत्यांना जिवंत जाळलं पाहिजे’
2 उत्तर प्रदेशची लढाई जिंकण्यासाठी भाजपाची ‘वोट कटवा’ पक्षांवर नजर
3 गुजरात ठरले आर्थिक मागासांच्या आरक्षणाची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य
Just Now!
X