08 August 2020

News Flash

CCTV Footage : अवघ्या ३० सेकंदात १० वर्षाच्या मुलाने बँकेतून चोरले १० लाख रुपये

संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद

(Photo: CCTV Screenshots)

मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील बँकेमधून चक्क एका १० वर्षीय मुलाने १० लाखांची चोरी केली आहे. निमच जिल्ह्यातील जवाद परिसरातील बँकेमध्ये १० वर्षीय मुलाने अवघ्या ३० सेकंदांमध्ये १० लाख रुपये लंपास केले आणि बँकेतील ग्राहक तसेच कर्मचाऱ्यांना याबद्दल काही पत्ताच लागला नाही. मात्र हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

द टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, सीसीटीव्ही फुटजेमध्ये एक १० वर्षीय मुलगा सकाळी ११ वाजता या सहकारी बँकेत प्रवेश करताना दिसतो. त्यानंतर हा मुलगा थेट पैसे ठेवलेल्या जागी जातो. या काउंटरसमोर ग्राहकांची मोठी रांग असल्याने कोणाचे या मुलाकडे लक्ष जात नाही. उंचीने अगदीच लहान असल्याने हा मुलगा अगदी टेबलाच्या आणि काउंटरच्या पलिकडे असल्याने लगेच दिसून येत नाही. हा मुलगा या काउंटवरील नोटांचे एक बंडल आपल्या बँगेत टाकतो आणि चालत तिथून निघून जातो. हे सर्व तो अवघ्या ३० सेकंदांमध्ये करतो. दरवाजाबाहेर आल्यानंतर हा मुलगा पळू लागतो. कोणाला काय घडलं हे कळण्याच्या आतच हा मुलगा चोरी करुन बँकेबाहेर गेलेला असतो. हा मुलगा पळू लागताच बँकेतील सायरन वाजतो. त्यामुळेच बँकेचा वॉचमन या पळणाऱ्या मुलाचा पाठलाग करतो.

पोलिसांनी या प्रकरणाचे सीसीटीव्ही फूटेज तपासले असता या मुलाला एक विशीमध्ये असणारा तरुण सर्व माहिती देत असल्याचे दिसून येते. हा तरुण बँकेत ३० मिनिटांहून अधिक काळापासून उपस्थित असल्याचे फूटेजमधून स्पष्ट होत आहे. कॅश काउंटवरील कर्मचारी जागेवरुन उठल्याचे पाहताच हा तरुण बँकेबाहेर असणाऱ्या या लहान मुलाला इशारा करतो. हा मुलगा आत येतो ५०० रुपयांच्या नोटा असणारे दोन मोठे बंडल बॅगेत टाकतो आणि बँकेच्या बाहेर निघून जातो असं या सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.

“मुलाची उंची कमी असल्याने या काउंटरसमोर उभ्या असणाऱ्या ग्राहकांना तो चोरी करताना दिसला नाही,” असं निमचचे पोलीस अधीक्षक मनोज राज यांनी सांगितलं आहे. या प्रकरणी फॉरेन्सीक तज्ज्ञांची मदत घेण्यात येत आहे. जवाद पोलीस स्थानकाचे प्रमुख अधिकारी असणाऱ्या ओ. पी. मिश्रा यांनी बँकेच्या बाहेर असणाऱ्या सीटीटीव्हीमध्ये हा मुलगा आणि त्याला मदत करणारा तरुण विरुद्ध दिशेला धावताना दिसत आहेत. “या प्रकरणात अनेक संक्षयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. रस्त्याच्या बाजूला दुकानं असणाऱ्या अनेकांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. खासगी सुरक्षा कंपनीच्या सुरक्षारक्षकाचीही चौकशी केली जात आहे,” असंही मिश्रा यांनी सांगितलं.

लहान मुलांच्या मदतीने चोरी करणारी एक गँगच सक्रीय असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2020 9:10 am

Web Title: madhya pradesh 10 year old boy steals rs 10 lakh from bank scsg 91
Next Stories
1 ओबामा, बिल गेट्स, अ‍ॅपलची अकाउंट हॅक झाल्यानंतर ट्विटरचे सीईओ म्हणतात, “आज आमच्यासाठी…”
2 करोनाचं व्हॅक्सिन देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचवणार : निता अंबानी
3 करोनाचा उद्रेक… अमेरिकेत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ
Just Now!
X