03 March 2021

News Flash

मध्य प्रदेश: विवाह सोहळ्यावरून परतणाऱ्या कारला भीषण अपघात, ३ चिमुकल्यांसह १२ जणांचा मृत्यू

सर्व मृत एकाच कुटुंबातील असून ते सर्वजण उज्जैन येथील रहिवासी होते.

ही घटना उज्जैन शहरापासून १२ किमी अंतरावर उन्हेल रस्त्यावरील सोडंग येथे रात्री १२ च्या सुमारास घडली. (छायाचित्र: एएनआय)

नागदा येथून विवाह सोहळा आटोपून परतत असलेल्या कारची समोरून येणाऱ्या दुसऱ्या कारशी झालेल्या धडकेत तीन चिमुकल्यांसह १२ जण ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना उज्जैन शहरापासून १२ किमी अंतरावर उन्हेल रस्त्यावरील सोडंग येथे रात्री १२ च्या सुमारास घडली. सर्व मृत एकाच कुटुंबातील असून ते सर्वजण उज्जैन येथील रहिवासी होते.

अपघातग्रस्त कारच्या मागे असलेल्या बसमधील प्रत्यक्षदर्शी प्रवासी दीपक कायत यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही कारची समोरासमोर जोराची धडक बसली. अपघातानंतर स्थानिक लोक जखमींच्या मदतीसाठी त्वरीत धावले. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने रात्री एक वाजता जखमी आणि मृतांना जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. मृतांमध्ये भाजपाचे माजी मंडल महामंत्री अर्जुन कायत यांचाही समावेश आहे.

मृतांमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश
या अपघातात एकाच कुटुंबातील पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अर्जुन कायत, पत्नी राजूबाई, मुलगा शुभम आणि दोन मुली रविना आणि बुलबुल यांचा समावेश आहे. त्याशिवाय कुलदीप, तिजाबाई, धर्मेंद्र, सलोनी, चचंल, सिद्धी आणि राधिका यांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2019 8:14 am

Web Title: madhya pradesh 11 people killed in head on collision between two cars near ramgarh village in ujjain district
Next Stories
1 ‘तुमचं तुमच्या मुलांवर प्रेम असेल तर मोदींना नव्हे ‘आप’ला मतदान करा’
2 ८२ प्लॉट, २५ दुकानं, मुंबईत फ्लॅट, पेट्रोल पंप आणि दोन कोटी रोख रुपये, अधिकाऱ्याकडे सापडलं घबाड
3 लोकसभा निवडणुकीनंतर करणार भारताशी चर्चा – पाकिस्तान
Just Now!
X